धक्कादायक ! 1 वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी केला हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
बीकानेर जिल्ह्याच्या छत्तरगड क्षेत्रामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याने एक वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्या अंगावर 40 हून जास्त चावा घेतल्याच्या खुणा होत्या. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी तिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी संसारदेसर ग्राम पंचायतच्या चक तीन केडब्ल्य्यूएसएम मध्ये घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल असे त्या चिमुरडीचे नाव होते. कोमल अन्य मुलांसोबत घराबाहेर खेळत होती. दरम्यान अचानक तिथे भटके कुत्रे पोहोचले आणि त्यांनी तिच्यावर हल्ला करण्यात आला. मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातील सर्व लोकांनी धाव घेतली आणि मुलीला त्या कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. त्या कुत्र्यांना मुलीच्या कुटुंबातील लोकं कायम चपाती द्यायचे.
मुलीच्या शरीरावर 40 हून अधिक चावा त्या कुत्र्यांनी घेतले होते. तर काही जागेंवर त्वचाच दिसत नव्हती. तिचे लचके तोडले होते. चेहऱ्यासह हाता पायावर गंभीर जखमा होत्या. तिला तत्काळ श्रीगंगानगर जिल्ह्यातील घडसाना येथील रुग्णालयात भरती केले होते. डॉक्टरांनी तिच्यावर तत्काळ उपचार सुरु केले मात्र उपचारा दरम्यान कोमलचा मृत्यू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List