शालेय साहित्य घ्यायला पैसे नाहीत; मुलानं गळफास घेत जीवन संपवलं, त्याच दोरखंडानं बापानंही मृत्युला कवटाळलं

शालेय साहित्य घ्यायला पैसे नाहीत; मुलानं गळफास घेत जीवन संपवलं, त्याच दोरखंडानं बापानंही मृत्युला कवटाळलं

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मिनकी येथे सततच्या नाफिकीने आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकरी पिता-पुत्राने आत्महत्या केली आहे. राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय – 43) आणि त्यांचा शाळकरी मुलगा ओमकार राजेंद्र पैलवार (वय – 16) अशी पिता-पुत्राची नावे आहेत. दोघांनीही स्वत:च्या शेतात गळफास घेत मृत्युला कवटाळले. गुरुवारी (9 जानेवारी) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र पैलवार यांना बिलोली तालुक्यातील मिनकी येथे 2 एकर शेती आहे. या जमिनीवर त्यांना साडे चार लाखांचे कर्ज होते. महाराष्ट्र ग्रामीण बँक (खतगाव) या शाळेकडून त्यांनी कर्ज घेतले होते. सततची नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा याची चिंता त्यांना होती. यावरून घरात खटकेही उडत होते.

राजेंद्र यांचा मुलगा ओमकार हा उदगीर येथे शिक्षणास होता. संक्रातनिमित्त तो गावाकडे आला होता. 8 जानेवारी रोजी दुपारी ओमकाराने वडिलांकडे नवीन कपडे, शालेय साहित्य आणि नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी हट्ट केला. मात्र वडिलांनी सध्या पैसे नाहीत, काही दिवस थांब. पैसे आले की घेऊन देतो असे म्हटले. त्यामुळे नाराज झालेला ओमकार रात्रीच्या सुमारास शेतात गेला आणि तिथेच झाडाला गळफास घेतला.

मुलगा घरी नसल्याचे पाहून राजेंद्र पैलवार हे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची शोधाशोध करू लागले. यावेळी शेतातील लिंबाच्या झाडाला ओमकार याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. हे पाहताच वडिलांचेही अवसान गळाले आणि त्यांनी मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने त्याच झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावावर शोककळा

कर्जबाजारीपणामुळे पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावावर शोककळा पसरली असून पैलवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बॉलिवूडच्या बड्या हस्तीचं निधन, पण नीना गुप्तांचा श्रद्धांजलीस नकार; म्हणाल्या, त्याने माझ्या… बॉलिवूडच्या बड्या हस्तीचं निधन, पण नीना गुप्तांचा श्रद्धांजलीस नकार; म्हणाल्या, त्याने माझ्या…
विख्यात दिग्दर्शक प्रीतीश नंदी यांचे नुकतेच निधन झाले. बुधवारी 8 जानेवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधील अनेकजण...
गौरी नवरा शाहरुख खानचे सर्व चित्रपट फ्लॉप होण्याची देवाकडे सतत प्रार्थना का करायची?
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत 22 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; अभिनेता म्हणाला ‘लग्न वैगरे…’
तुमचेही काजळ लावल्यानंतर पसरते का? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स
Weightloss Tips: लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? जेवल्यानंतर ‘या’ गोष्टी करणं टाळा अन्यथा…
हृदयाच्या आरोग्यासाठी कॉफी प्यायची योग्य वेळ कोणती ? तज्ज्ञांचे म्हणणे काय?
हिवाळ्यात कोरडेपणामुळे सतत अंगाला खाज सुटतेय? करा हे घरगुती उपाय लगेच मिळेल आराम