श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा कंपनीचा ठेका रद्द

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा कंपनीचा ठेका रद्द

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समिती आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिंग पद्धतीने कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई-निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अॅड सिस्टिम्स प्रा. लि., पुणे यांची निविदा मंजूर होऊन ४ जुलै २०२४ रोजी करारनामा करण्यात आला होता. तथापि, त्यांच्याकडून करारनाम्यातील अटी व शर्तीचे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

कर्मचारी पुरवठा कामामध्ये वारंवार नोटीस देऊनही त्या संदर्भात सुधारणा होत नसल्याचे दिसून आले होते. तसेच त्यांच्या कामाबाबत विविध प्रकारच्या लेखी तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्यावर मंदिर समितीच्या १० डिसेंबर २०२४ रोजीच्या सभेत चर्चा होऊन पुढील कार्यवाही करण्याचे ठरले होते. त्यानुसार संबंधित कंपनीला अंतिम नोटीस देण्यात आली होती. त्यावर त्यांनी सादर केलेला खुलासा वस्तुस्थितीला धरून व समाधानकारक नाही. मंदिर समितीने फेब्रुवारी २०२४ मंदिर समितीला कर्मचारी पुरवठा करणे कामी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे ४ कोटी ५० लाख होती. या प्रक्रियेत १२ पुरवठाधारकाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये रक्षक कंपनीचा ठेका मंजूर झाला होता.

रक्षक कंपनीने नियुक्त केलेले कर्मचारी हे भाविकांना धक्काबुक्की करतात. कर्मचारी आयडी कार्ड व गणवेश परिधान करीत नाहीत. नेमून दिलेली सेवा व्यवस्थितपणे पार न पाडणे, मंदिरात प्रवेश करणाऱ्या गेटवर भाविकांची तपासणी न करता मोबाईलसह मंदिरात प्रवेश देऊन करारातील अटी शर्तीचा भंग करणे, २५ पैकी फक्त दोन माजी सैनिक नियुक्त करून करारातील अटींचा भंग केला. तसेच, कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिप न देणे, सेवेच्या ठिकाणी मोबाईल वापरणे व इतर अनुषंगिक गैरवर्तन करीत असल्याच्या बाबी अनेकवेळा निदर्शनास आलेल्या आहेत. याबाबत अनेकवेळा लेखी व मौखिक सूचना करूनही सुधारणा झाली नाही. याबाबत मंदिर समितीने संस्थेविरुद्ध अनेकवेळा ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून व समज देऊनही सुधारणा होत नसल्याने दंडात्मक कारवाईही केली होती.

तथापि, त्यासंदर्भात सुधारणा अथवा कोणतीच कारवाई झाली नाही. हा करार यापुढे सुरू ठेवल्यास मंदिर समितीची प्रतिमा मलिन होईल. त्याचा भाविकांच्या सोईसुविधांवर परिणाम होऊन त्याचा रोष मंदिर समितीवर येऊ शकतो. त्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध होऊन मंदिर समितीची बदनामी झाली आहे. दि. ४ जानेवारी रोजी ‘भटक्या कुत्र्यांचा मंदिरात मुक्त वावर’, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. यावरून त्यांच्याकडील कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत नसल्याचे पुन्हा एखदा दिसून आले. त्यामुळे ही संस्था करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कामकाज करू शकत नसल्याने आणि वारंवार नोटीस देऊनही त्या संदर्भात योग्य तो खुलासा व सुधारणा होत नसल्याने, त्यांच्याशी करण्यात आलेला करार रद्द करणे क्रमप्राप्त झाले होते, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रवेश वर्मा यांची निवडणूक आयोग करणार चौकशी, अरविंद केजरीवाल यांनी आचारसंहिता भंगाची केली होती तक्रार प्रवेश वर्मा यांची निवडणूक आयोग करणार चौकशी, अरविंद केजरीवाल यांनी आचारसंहिता भंगाची केली होती तक्रार
भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन केल्याची तक्रार आम आदमी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. यातच आता...
युजवेंद्र धनश्रीनंतर आणखी एका क्रिकेटपटूच्या घटस्फोटाच्या चर्चा, पत्नीसोबतचे फोटो केले डिलिट
‘सरडा रंग बदलतो, पण अशी नवीन जात…’, एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना डिवचले
‘महिला आयोगावर कचकड्या भावल्या बसवल्यामुळं…’ पुण्यातील ‘त्या’ प्रकरणावरून अंधारेंचा चाकणकरांना टोला
‘एवढा मोठा माणूस असं बोलतोय…’, L&T कंपनीच्या चेयरमनच्या 90 तासांच्या वक्तव्यावर दीपिका पदुकोण भडकली
खो-खोच्या राष्ट्रीय संघांमध्ये महाराष्ट्राचा बोलबाला, पुरुषांच्या कर्णधारपदी प्रतिक वाईकर तर महिलांच्या कर्णधारपदी प्रियांका इंगळे
दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरु करा, अन्यथा गोरखपूर गाडी थांबवणार – विनायक राऊत