छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलविरोधी मोहीम सुरू, चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमधील सुकमा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलाकडून नक्षलविरोधी शोध मोहीम सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुकमा डीआरजी, एसटीएफ आणि कोब्राच्या संयुक्त पोलिसांकडून ही मोहीम सुरू आहे. गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
छत्तीसगडमध्ये पोलिसांवर नक्षलवाद्यांनी आयडी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुकमा आणि विजापूरमध्ये शोध मोहीम सुरू आहे. विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले.
नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम सुरूच
पोलिसांवर केलेल्या हल्ल्यानंतर नक्षलवादी सुकमा परिसरात मोठी घटना घडवण्याची योजना आखत होते. गुप्तचर सुरक्षा संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि चकमक सुरू केली. जागरगुंडा भागात पोलीस दलाने दोन डझनहून अधिक नक्षलवाद्यांना घेरले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List