निवडणुकीआधी महिलांना पैसे वाटप? भाजप नेत्यांविरोधात ED कडे ‘आप’ने दाखल केली तक्रार

निवडणुकीआधी महिलांना पैसे वाटप? भाजप नेत्यांविरोधात ED कडे ‘आप’ने दाखल केली तक्रार

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. यातच निवडणूक जाहीर होण्याआधी भाजप नेते प्रवेश वर्मा यांनी दिल्लीत महिलांना पैसे वाटप केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्यावर रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. यानंतर आता आपने प्रवेश वर्मा यांच्याविरोधात ईडीत तक्रार दाखल केली आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी ईडी कार्यालयात पोहोचत ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर आप खासदार संजय सिंह म्हणाले, ”ईडी कार्यालयांनी तक्रार पत्र स्वीकारले आहे. मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने आम्हाला कोणत्याही प्रकारच्या कारवाईचे आश्वासन दिले नाही. ईडी काय करेल हे मी सांगू शकत नाही. त्यांनी तक्रारीची अधिकृत पावती दिली आहे.”

दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्यावर रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. आतिशी म्हणाल्या होत्या की, नवी दिल्ली विधानसभेत भाजप लोकांचे मतदार ओळखपत्र पाहून त्यांना पैसे वाटप करत आहे. भाजप नेते प्रवेश वर्मा यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. आतिशी यांनी एक फोटो शेअर करत दावा केला की, नवी दिल्लीतील भाजप नेते परवेश वर्मा यांचे अधिकृत निवासस्थान 20 विंडसर प्लेस येथे महिलांना 1100 रुपये वाटले जात आहेत.

आतिशी यांनी ईडी-सीबीआय आणि दिल्ली पोलिसांना परवेश वर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याचे आवाहनही केले होते. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतूनच निवडणूक लढवतात. आतिशी म्हणाल्या की, ”प्रवेश वर्मा खासदार म्हणून मिळालेल्या सरकारी बंगल्यात वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधून महिला मतदारांना बोलावले होते. त्यांचा मतदार ओळखपत्र तपासल्यानंतर एक फॉर्म भरण्यात आला आणि प्रत्येक महिलेला लिफाफ्यात 1100 रुपये देण्यात आले.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या; एकीवर अत्याचार 54 वर्षीय नराधमाला अटक राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या; एकीवर अत्याचार 54 वर्षीय नराधमाला अटक
राजगुरू नगर (खेड)मधून गायब झालेल्या दोन्ही चिमुकल्या बहिणींची हत्या झाल्याचे उघडकीस आले असून शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्यानेच हे कृत्य केले...
‘आंबेडकरी आई’ ग्रंथाचे शनिवारी दादरमध्ये प्रकाशन
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणार ; देश-विदेशातून अनुयायी
नवे सरकार येताच मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन पुन्हा चर्चेत
डॉ. मनमोहन सिंग यांचे निर्वाण, हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला ठणठणीत करणारा ‘डॉक्टर’ हरपला
अल्पवयीन मुलांना बोलण्यात गुंतवून किमती ऐवजाची चोरी; बोलबच्चन करणाऱ्या तरुण ताब्यात
भाजपला एका वर्षात 2244 कोटींच्या देणग्या, ईडीची धाड पडलेल्या कंपन्यांचे धनही पोहचले; काँग्रेसच्या खात्यात 289 कोटी