जोरदार वाऱ्यामुळे पॅराशूट अनियंत्रित झालं, उड्डाण घेण्याऐवजी जमिनीवर कोसळल्याने पर्यटकाचा मृत्यू
उड्डाण घेत असताना जोरदार वाऱ्यामुळे पॅराशूट अनियंत्रित झालं आणि उड्डाण घेण्याऐवजी जमिनीवर कोसळलं. या अपघातात आंध्र प्रदेशच्या तरुण पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश रेड्डी असे मयत पर्यटकाचं नाव आहे. मनालीपासून 20 किमी अंतरावर रायसन येथे ही घटना घडली.
आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेला महेश रेड्डी हा तरुण रायसन येथे पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी गेला होता. पॅराशूट उड्डाण घेत असतानाच जोरदार वारा आला आणि ग्लायडरच्या उड्डाणावर परिणाम झाला. यामुळे उड्डाण घेण्याऐवजी पॅराशूट खाली कोसळलं. यात महेश गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत महेशला तात्काळ प्रथम भुंतरमधील हरिहर रुग्णालयात मग मंडी येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List