हे असले बॉस? परवाना नसताना धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तुल, गुन्हा दाखल करण्याची दमानिया यांची मागणी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तुल असलेला एक फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर असे फोटो आणि रील्स पाहून नवी पिढी काय प्रेरणा घेणार असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच धनंजय मुंडेंकडे पिस्तुलाचे लायसन्स नाही तरी त्यांच्याकडे पिस्तुल आहे, त्यासाठी मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
एक्सवर पोस्ट करून दमानिया म्हणल्या की, हे असले बॉस ? इन्स्टाग्रामवर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ?ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
हे असले बॉस ?
इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ?
कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते.
आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ?
ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज… pic.twitter.com/bQGa71D79D
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 26, 2024
तसेच एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुंडे यांच्या नावाने कुठलेही लायसन्स नाही. मुंडे यांच्या आईंच्या नावे लायसन्स आहे. बीडमधील सर्व परवान्यांची चौकशी व्हावी. बीडमध्ये 1222 बंदुकीचे लायसन्स देण्यात आले आहेत. धनंजय मुंडे आमदार असताना अशी बंदुक वापरणे हे चुकीचे आहे असेही दमानिया यांनी नमूद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List