बिहारमध्ये लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याने तणाव
बिहार लोकसेवा आयोगाच्या 70 व्या प्राथमिक परीक्षेचा पेपर फुटल्याचे वृत्त पसरले आणि बिहारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाल्याची घटना आज घडली. पेपरफुटीच्या वृत्तामुळे जवळपास 300 ते 400 विद्यार्थ्यांनी बीपीएससीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकला तसेच बीपीएससीविरोधात जोरदार निदर्शने केली. बीपीएससीने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, या गोंधळामुळे परीक्षा केंद्रावरच राम इक्बाल सिंह या अतिरिक्त परीक्षा अधीक्षकाचा कार्डियाक अॅरेस्टमुळे मृत्यू झाला, तर एक महिला कर्मचारी बेशुद्ध झाल्याचे वृत्त आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी पाटणा येथील कुम्हार येथील बापू परीक्षा केंद्रावर गर्दी केली आणि बीपीएससी आणि राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List