वाल्मीक कराडला राजाश्रय! – प्रकाश सोळंके
खून, अपहरण, खंडण्या मागणाऱ्यांना, दहशत माजवणाऱ्यांना पकडले जात नाही. हे बीड जिह्यासाठी अत्यंत दुर्दैवाचे आहे. 18 दिवस होऊन गेले तरी संतोष देशमुखांचे मारेकरी हाती लागत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात कोणाचीही गय करणार नसल्याचे म्हटले होते. मग वाल्मीक कराड का सापडत नाही, त्याला राजाश्रय आहे म्हणूनच! असा हल्लाबोल आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.
खून, अपहरण, खंडण्या, दहशत माजवणे, गोळीबार करणे असे राजकीय हस्तक्षेपाशिवाय घडूच शकत नाही. गुन्हेगारांना बीड जिह्यात भीतीच राहिली नाही. आपल्यामागे कोणीतरी ठाम उभा आहे. या मानसिकतेतूनच गुंडांचे राज्य बीडमध्ये निर्माण झाले आहे, असे सोळंके म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List