Mumbai crime news – शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वृद्धाची 2 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. शेषनाथ ऊर्फ गणेश पांडे, सतीश पुनामिया आणि रामकुमार अशी त्यांची नावे आहेत. त्या तिघांकडून पोलिसांनी सहा मोबाईल जप्त केले आहे. त्या तिघांनी ठगांना विविध बँकेत खाती उघडून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक महिला आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये जोडले होते. अॅडमिनने त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देऊ असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी 2 कोटी 85 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यावर काही महिन्यात त्यांना चांगला नफा झाल्याचे दिसले.
तक्रारदार यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती रक्कम खात्यात ट्रान्स्फर होत नव्हती. याची माहिती त्याने त्याच्या मुलीला दिली. त्यानंतर महिलेने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी ज्या खात्यात पैसे जमा झाले होते त्या बँक खात्याची माहिती काढली. ती खाती पांडे, सतीश आणि रामकुमारची असल्याचे समोर आले. तपासादरम्यान माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List