ट्रॅक्टर मार्च, रेल रोको; काय आहे आंदोलक शेतकऱ्यांची नवीन रणनीती? जाणून घ्या

ट्रॅक्टर मार्च, रेल रोको; काय आहे आंदोलक शेतकऱ्यांची नवीन रणनीती? जाणून घ्या

आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी नेत्यांनी नवी रणनीती आखली आहे. आता 16 डिसेंबरला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं शेतकरी नेते सर्वनसिंह पंधेर यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत रेल रोको करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, आंदोलक शेतकरी जेव्हा दिल्लीकडे कूच करतील तेव्हा हरियाणातील शेतकरी आणि महिलाही तिथे असतील.

पंधेर म्हणाले की, आम्ही सर्व घटकांना आवाहन करतो की, उठा. 3 कोटी पंजाबींनी सर्वत्र रेल्वे अडवावी, असं आवाहनही आम्ही केलं आहे. जिथे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे फाटक आहे, तिथे रेल्वे गाड्या अडवाव्या. आपल्या देशात 50 टक्के लोक शेतीत गुंतलेले आहेत, त्यांचा आवाज दाबता येणार नाही. शेतकरी नेते जगजित सिंग खनौरी सीमेवर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची ढासळलेली प्रकृती सर्वांसमोर आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संतोष देशमुख हत्या प्रकरण : तो बडा नेता कोण? अंजली दमानियांच्या नव्या ट्विटनं खळबळ संतोष देशमुख हत्या प्रकरण : तो बडा नेता कोण? अंजली दमानियांच्या नव्या ट्विटनं खळबळ
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता वीस दिवस झाले...
प्राजक्ता माळी आणि सुरेश धस वादात गुणरत्न सदावर्तेंची उडी, केली मोठी मागणी
शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन
उर्फी जावेदला शिवीगाळ, थेट मिया खलीफाशी तुलना…, अभिनेत्रीने शो अर्धवट सोडला
बॉलिवूड अभिनेत्याने किसिंग सीनसाठी घेतले 37 रिटेक; अभिनेत्रीने जाणूनबुजून केल्याचा आरोप
T20 Cricketer Of The Year – जसप्रीत बुमराहऐवजी ‘या’ खेळाडूला ICC चे नामांकन; जाणून घ्या सविस्तर…
24 तासात 3 मोठे विमान अपघात; कुठे लागली आग, तर कुठे धावपट्टीवर घसरले विमान