त्र्यंबकेश्वर मंदिरात 5 जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
त्र्यंबकेश्वर मंदिरातील भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने 5 जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांना असलेल्या सुट्ट्यांमुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून देशभरातून हजारो भाविक आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.
नववर्षानिमित्तदेखील गर्दी वाढणार आहे. त्याचे योग्य नियोजन करता यावे, तसेच मंदिर प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन 5 जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद राहील. केवळ केंद्र, राज्य स्तरावरून पिंवा जिल्हाधिकाऱयांमार्फत प्राप्त होणाऱ्या राजशिष्टाचारसंबंधी लेखी पत्रव्यवहाराने दररोज अतिमहत्त्वाच्या वीस व्यक्तींना सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 6 ते 7 या वेळेत दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List