पीएफ काढण्यासाठी आता एटीएम कार्ड मिळणार

पीएफ काढण्यासाठी आता एटीएम कार्ड मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची रक्कम काढणे आता अधिक सोयीस्कर होणार आहे. कारण कर्मचाऱयांना नवीन वर्षांत पीएफची रक्कम थेट एटीएममधून काढता येणार आहे. या योजनेंतर्गत एटीएम कार्डप्रमाणे ईपीएफओ सदस्यांना पैसे काढण्यासाठी एक कार्ड दिले जाईल. कर्मचाऱ्यांना कार्ड मिळण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील. सध्या कर्मचाऱयांना त्यांचे पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतर काही दिवस वाट पाहावी लागते, पण नवीन प्रणालीनुसार पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. ईपीएफओ त्यांच्या सात कोटींहून अधिक ग्राहकांना बँकिंग प्रणालीच्या बरोबरीने सेवा प्रदान करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाला एक मोठा दिलासा मिळेल.

7 लाखांपर्यंत रक्कम काढता येणार

नवीन प्रणालीद्वारे लाभार्थी एटीएमद्वारे त्यांच्या हक्काची रक्कम काढू शकतील. तसेच मृत सदस्यांच्या वारसांना ईपीएफओद्वारे चालवल्या जाणाऱया एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) या योजनेंतर्गत कमाल सात लाख रुपये काढता येतील. याशिवाय मृत ईपीएफओ सदस्याचा वारसदेखील पैसे काढण्यासाठी एटीएम वापरण्यास सक्षम असेल. मात्र ईपीएफओने ही सुविधा नेमकी कधीपासून सुरू करणार आहे, हे अद्याप स्पष्ट केले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याणमध्ये पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला, एकाचा मृत्यू, 2 ते 3 जण जखमी कल्याणमध्ये पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला, एकाचा मृत्यू, 2 ते 3 जण जखमी
मोठी बातमी समोर आली आहे, कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याणच्या म्हारळ येथील एमआयडीसी परिसरात पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला आहे....
‘प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही, निषेध म्हणून मीसुद्धा आता…’, सुरेश धस यांची घोषणा
अमिताभ बच्चनपासून तृप्ती डिमरीपर्यंत, बॉलिवूड स्टार्स रिअल इस्टेटमध्ये का करतायत मोठी गुंतवणूक?
नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली मुरुडला पर्यटकांची पसंती; सुमद्रकिनारे गर्दीने फुलले
संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं – अमोल कोल्हे
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; जयंत पाटील यांची मागणी
गूगल मॅपने धोका दिला, कार थेट निर्माणाधीन रस्त्यावर पोहचली; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले