मंदिराला हात लावून बघा, मग तुम्हाला शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे, ते दाखवतो – संजय राऊत
”शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक कडवट भूमिका घेतली, दादर येथील हे 80 वर्षांपूर्वीचे मंदिर आहे, जे श्रमिक, हमाल यांनी बांधलं असून याला कसं काय हात लावू शकता तुम्ही? याचं कारण काय आहे. मंदिराला हात लावता येणार नाही. मंदिराला हात लावून बघा मग आम्ही तुम्हाला शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे ते दाखवतो, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. आज दादर येथील हनुमान मंदिरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाआरती झाली. याआधी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत असं म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, देशात महाआरतीची सुरुवात आधी शिवसेनेने सुरू केली. यातच आदित्य ठाकरेजी आणि शिवसैनिक जे या महाआरतीला आले आहेत, ही काही नवीन गोष्ट नाही, मात्र कोणासाठी ही नवीन गोष्ट असूही शकते. 1990 मध्ये जेव्हा अयोध्येचे आंदोलन सुरू होते, त्यावेळी आम्ही जागोजागी मुंबई आणि महाराष्ट्रात महाआरती करत होतो. या महाआरतीची सुरुवात आणि संकल्पना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि आजही आम्ही ती जारी ठेवली आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List