अल्लू अर्जुनला कपडे पण घालू दिले नाही, नाश्ताही केला नाही; पोलिसांनी थेट बेडवरूनच…, अटकेवर अभिनेता संतापला
‘पुष्पा 2’ चित्रपटानं देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट बॉकबास्टर ठरला असून बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रम झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, त्याचं कारण म्हणजे या चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केलं आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये गोंधळ उडाला यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अलू अर्जुन याला अटक करून चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.समोर आलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनला पोलिसांनी ज्या पद्धतीनं अटक केली, त्यावर त्याने आक्षेप घेतला आहे.
अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया
सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन याला पोलिसांनी ज्या पद्धतीनं अटक केलं त्यावर अभिनेत्यानं सवाल उपस्थित केला आहे. अल्लू अर्जुनने असा दावा केला की, मला नाश्ता देखील करून दिला नाही, कपडे पण घालू दिले नाहीत. थेट मला माझ्या बेडरूममधून अटक करण्यात आली. मात्र अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन एका लिफ्टमधून जाताना दिसत आहे, जेव्हा तो लिफ्टमध्ये होता तेव्हा त्याने प्लेन ड्रेस घातलेला होता, मात्र त्यानंतर त्याने कपडे बदलले, या व्हिडीओला ‘फ्लावर नहीं फायर है’ असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे.
अल्लू अर्जुनच्या अटकेचा देखील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या फॅन्सनी त्याच्याभोवती गर्दी केल्याचं दिसून येत आहे. अल्लू अर्जुने या व्हिडीओमध्ये पांढऱ्या कलरचा टी शर्ट घातला आहे. या शर्टवर हिंदीमध्ये ‘फ्लावर नहीं, फायर है मैं’ असा मजकूर लिहिलेला आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू -अर्जुन हा चहा पिताना देखील दिसत आहे. मात्र दुसरीकडे त्याची पत्नी स्नेहा रेड्डीच्या चेहऱ्यावर मात्र त्रासिक भाव दिसत आहे. त्यानंतर अल्लू अर्जुने आपल्या पत्नीची समजूत घातली, त्यानंतर तो पोलिसांच्या वाहनाने पोलिसांसोबत पोलीस स्टेशनला रवाना झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List