देवाभाऊ, पुरेशा पाण्याचा वायदा किती वेळा देणार? मतदारांचा सवाल; 5 वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा

देवाभाऊ, पुरेशा पाण्याचा वायदा किती वेळा देणार? मतदारांचा सवाल; 5 वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा

मार्च 2023 मध्ये चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही, शहर टँकरमुक्त करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले होते. पाणीप्रश्नावरून सोसायटीधारकांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकही घेत त्यांची मते भाजप उमेदवाराच्या पदरात पाडून घेतली. दीड वर्षापूर्वी फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनानंतरही चिंचवडमधील विविध सोसायट्यांमधील नागरिकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दीड वर्षांपूर्वी दिलेले पुरेसे पाणी देण्याचा वायदा देवाभाऊ पुन्हा देऊ लागले आहेत. शहराला गेल्या पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे देवाभाऊ आता पुरेशा पाण्याची आश्वासने किती वेळा देणार, असा सवाल मतदार करत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची वाकडमध्ये सभा झाली. या सभेत फडणवीसांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. पिंपरी-चिंचवड शहराला मागील पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित, अपुरा व कमी दाबाने होतो. महापालिकेने आंद्रा धरणातून शंभर आणि भामा आसखेड धरणातून 167 असे 267 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले. मात्र, भामा आसखेड जलवाहिनीचे कामही अतिशय संथ गतीनेच सुरू आहे. अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम 52 टक्के पूर्ण झाले आहे, तर जलवाहिनी टाकण्यासाठी ज्या जागेचा ताबा मिळाला आहे, अशा ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे 35 टक्के काम पूर्ण झाले आहे.

जलवाहिनीचा 40 टक्के भाग राज्य शासनाच्या आस्थापनेअंतर्गत येत असल्याने त्यांच्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे. नुकतीच राज्याच्या वन विभागाकडून परवानगी मिळविण्यात महापालिकेला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून परवानगी दिली जात असली तरी जागामालक जागेचा ताबा देण्यास तयार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जागा ताब्यात घेण्यास विलंब होत आहे. त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत.

समाविष्ट गावांत पाण्याची बिकट परिस्थिती

भोसरी विधानसभा मतदारसंघातील चिखली, तळवडे, मोशी, डुडुळगाव, चहोली, वडमुखवाडी, चोविसावाडी, दिघी, बोपखेल, भोसरीचा काही भाग, मोशी प्राधिकरण आदी भागात लोकवस्ती सातत्याने वाढत आहे. असे असताना महापालिका प्रशासन आणि स्थानिक आमदार म्हणून महेश लांडगे यांनी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने समाविष्ट भागातील गावात पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

मार्च 2023 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पाण्याचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराला पुरेसे पाणी देण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र, दीड वर्षांनंतरही पाण्याची परिस्थिती जैसे थे आहे. आता विधानसभा निवडणुकीतही शहरवासीयांना पुरेसे पाणी देण्याचा मुद्दा पेटला आहे. पाण्यावरून नागरिकांचाही रोष वाढत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘एका महिन्यात मारून टाकणार…’, सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीकडून मोठा खुलासा ‘एका महिन्यात मारून टाकणार…’, सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीकडून मोठा खुलासा
Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी देणाऱ्या आणि 5 कोटी रुपये खंडनी मागणारा आरोपी बीखाराम बिष्णोई याला...
लग्नानंतर बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मोडले संसार
प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने आजार दूर होतात; जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल
हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होतो? रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली? मग ‘हे’ उपाय नक्की करा 
चांगली झोप न झाल्यास होऊ शकतो ‘या’ आजाराचा धोका, कसा कराल उपचार? 
तळवडेतील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार – अजित गव्हाणे
झेडपीच्या सभागृहातून कोण जाणार विधानसभेत ?