मविआचे सरकार येताच मराठवाड्यातील गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, पाणंद रस्तेही मजबूत करू : नाना पटोले

मविआचे सरकार येताच मराठवाड्यातील गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, पाणंद रस्तेही मजबूत करू : नाना पटोले

मराठवाड्यात गायरान जमिनीचा प्रश्न गंभीर असून अशोक चव्हाण दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तरिही त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देत या भागात शेतात जाण्यासाठी आजही पाणंद रस्ते आहेत, सरकार आल्यानंतर हे पाणंद रस्तेही मजबुत केले जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीतील काँग्रेस मविआचे अधिकृत उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण आणि भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंढेकर यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची मुदखेड मध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस असे चित्र कुठेच दिसत नसून येथील हुकूमशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहे, या हुकूमशाहीला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून दोनदा मुख्यमंत्रीपद, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये असते तर त्यांचा राजकीय उदय झाला नसता. दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचे घर भरण्याचेच काम केले. सत्तेचा वापर करून दहा पिढ्यांचा उद्धार केला आणि जेलमध्ये जावे लागेल या भितीने अशोक चव्हाण भाजपात गेले. भाजपात जाताच देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला 150 कोटी रुपये दिले. आता अशोक चव्हाण यांचा सातबारा खोडायची वेळ आली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, 67 हजार महिला राज्यातून बेपत्ता झाल्या आहे पण सरकारकडे त्याचे उत्तर नाही. मविआ सत्तेत आल्यानंतर महिलांचा मान मन्मान राखला जाईल, महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपये दिले जातील, राज्यभर एसटी बस प्रवास मोफत असेल. शिंदे भाजपा सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपये वसुल केले आहेत, युती सरकारचे यासाठी रेडकार्ड ठरलेले आहे. मविआ सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये’, गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले? ‘माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये’, गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले?
भाजपचे बोरिवली विधानसभेचे उमेदवार संजय उपाध्याय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोपाळ शेट्टी...
सत्तेत नसताना मनसेने रिझल्ट दिले, राज ठाकरे कळकळीने म्हणाले; एकदा संधी द्याच
सत्ता द्या 48 तासाच्या हातात सगळ्या मशिदीवरचे भोंगे काढून दाखवतो – राज ठाकरे
हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारं, आमदार कैलास पाटील यांची टीका
भाजपच्या नाराजीनंतरही अजितदादा मलिकांच्या प्रचारात आघाडीवर, म्हणाले कोणीही कितीही विरोध करू द्या तरीही..
पुन्हा पैशांचं घबाड, विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या रकमेसह 2 संशयास्पद व्हॅन सापडल्या, तपासाला वेग
‘खंजीर मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला’, राज ठाकरेंच्या शिलेदाराचंच खळबळजनक ट्विट