कोपरी-पाचपाखाडीत मशालीचाच बोलबाला
कोपरी -पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मशालीचाच बोलबाला दिसत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांच्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी जाऊन ते मतदारांशी थेट संवाद साधत असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत गद्दारी करणाऱ्यांचा बदला घेणारच, असा निर्धार खुद्द ठाणेकरांनीच केला आहे. धनशक्ती विरुद्ध निष्ठा अशी ही निवडणूक असून ठाणे हे शिवसेनेचेच असल्याचे पुन्हा एकदा दिसून येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. दिघे यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठींवर जोर दिला आहे. गावदेवी मंदिर, धर्मवीर आनंद दिघे चौक, कोळीवाडा, आनंद भारती, नारायण कोळी चौक, सिद्धिविनायक मंदिर, अष्टविनायक चौक, मंगला हायस्कूल, ठाणेकर वाडी, कोपरी स्टेशन परिसर असा सारा भाग त्यांनी पिंजून काढला आहे. सत्ता व पैशांच्या जोरावर कितीही फुशारक्या मारल्या तरी कोपरी-पाचपाखाडीतील जनता मशालीच्या पाठीशी ठाम उभी राहील असे केदार दिघे यांनी सांगितले.
पदयात्रेत उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, महिला आघाडी संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, माजी नगरसेवक गिरीश राजे, योगिनी चौबळ, अनिता प्रभू, भाई सावंत, प्रदीप शेंडगे, संजीव कुलकर्णी, व्यंकट कांबळे, विभागप्रमुख राजू शिरोडकर, संजय दळवी, अमोल हिंगे, सुहास देसाई, रवींद्र सिनलकर, प्रशांत जगदाळे, विनय चौबळ, विनोद यादव, स्वप्नील शिरकर, वसंत गवाळे आदी सहभागी झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List