सायरस मिस्त्रींना टाटा समूहात फूट पाडायची होती…; रतन टाटांचे आत्मचरित्रपर पुस्तक लवकरच

सायरस मिस्त्रींना टाटा समूहात फूट पाडायची होती…; रतन टाटांचे आत्मचरित्रपर पुस्तक लवकरच

सायरस मिस्त्रींना टाटा समूहात फूट पाडायची होती. त्यांच्या वागणुकीने त्रस्त होऊन पद सोडण्यास सांगितले होते, असा खुलासा रतन टाटांच्या आत्मचरित्रात वाचावयास मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्यात रतन टाटा यांचे  ‘रतन टाटा – अ लाइफ’ आत्मचरित्र प्रकाशित होणार असून ते थॉमस मॅथ्यू यांनी लिहिले आहे.

सायरस मिस्त्राr यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून त्यांच्या खराब कामगिरीपेक्षा त्यांच्या नैतिक मूल्यांमुळे हटवण्यात आले. टाटा सन्सचे अध्यक्ष झाल्यानंतरही मिस्त्री शापूरजी पालोनजी समूहाशी संबंधित राहिले. रतन टाटा याबद्दल अनेकदा बोललेही होते. मिस्त्राRचे निर्णय आणि कार्यशैलीवरून त्यांना टाटा समूह तोडायचा होता, असे वाटत होते. त्यांच्या काळात शेअर्सचा लाभांशही कमी मिळाल्याने ट्रस्टच्या कामात आर्थिक समस्या आल्या.

टाटांनी मिस्त्री यांना पत्र लिहून वैयक्तिक कारणे सांगून पद सोडण्यास सांगितले होते, परंतु तसे झाले नाही. 2012 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनलेल्या मिस्त्राr यांना 2016 मध्ये हटवण्यात आले. याबद्दल ‘रतन टाटा – अ लाइफ’मध्ये वाचता येईल.

प्रकाशक हार्पून कॉलिन्स यांनी टाटांच्या चरित्राच्या छपाईचे अधिकार मिळवण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती.

नोएल यांना कमी अनुभव

रतन टाटा नोएलचा आदर करत. ते म्हणायचे, नोएल सक्षम आहे, परंतु अनुभवाचा अभाव आहे. एवढा मोठा ग्रुप चालवण्यासाठी आवश्यक अनुभव नोएलकडे नाही, असे मॅथ्यू यांनी सांगितले. मॅथ्यू आणि रतन टाटा यांच्या नात्याची सुरुवात 1995 मध्ये झाली, जेव्हा मॅथ्यू उद्योग मंत्रालयात सचिव होते.

चूक झाली

या जीवनचरित्रपर पुस्तकात सायरस मिस्त्राr यांची नियुक्ती ही आपल्याकडून चूक होती, हे रतन टाटा यांनी मान्य केले आहे. सायरस मिस्त्री यांच्या ब्रिटिश शिक्षणाने मला आंधळे केले होते. मला वाटले की, असे प्रभावी शिक्षण असलेल्या व्यक्तीचा डीएनए वेगळा असेल. निवड समितीचा निर्णय अतिशय आदर्शवादी असून वेळेच्या मर्यादेमुळे घाईघाईने निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी मान्य केले. अखेर रतन टाटांनी मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठीही त्याला अशा प्रकारे काढून टाकणे ही आमच्या कामाची पद्धत नव्हती. तरीही सर्जिकल स्ट्राइकसारखे केले नसते तर मिस्त्री कायदेशीर कारवाई करू शकले असते, अशी कबुली टाटांनी पुस्तकात दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल
शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करणाऱया सदाभाऊ खोत यांच्यावर अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी...
राहुल गांधींचे तोंड बंद करण्यासाठी भाजप त्यांच्यावर खोटय़ा केसेस टाकतोय
स्वावलंबी महाराष्ट्र! सर्वोत्तम महाराष्ट्र!! शिवसेनेचा वचननामा; महिलांना वाढीव निधी, प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचा विमा
महाराष्ट्राचे वैभव पुन्हा मिळवून देणार, शिवसेनेचा वचननामा
भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नाही, तर हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तों को बाटेंगे! उद्धव ठाकरे यांचा घणाघात
खोकेबाजांना हटवा; सामान्यांचे सरकार आणा, आदित्य ठाकरे यांचे आवाहन
महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला