ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या प्राध्यापिका वीणा देव यांचे निधन
लेखन, संकलन, संपादन असे साहित्य प्रकार लीलया हाताळून अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारामध्ये योगदान देणाऱया ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या प्राध्यापिका डॉ. वीणा देव (75) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून काम केलं. तेथे त्यांनी 32 वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. मराठी कथा-कादंबऱयांची नाटय़रूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
‘कधीकधी’, ‘परतोनी पाहे’, ‘स्त्र्ााrरंग’, ‘विभ्रम’, ‘स्वान्सीचे दिवस’ हे त्यांचे लेखसंग्रह वाचकप्रिय आहेत. ‘स्मरणे गोनिदांची’ हा स्मरणग्रंथ आणि यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन पुस्तपं आहेत. तसेच त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत. वीणा देव यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार देण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List