Jammu-Kashmir – किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांकडून ग्राम संरक्षक गटाच्या सदस्यांचे अपहरण आणि हत्या

Jammu-Kashmir – किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांकडून ग्राम संरक्षक गटाच्या सदस्यांचे अपहरण आणि हत्या

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ग्राम संरक्षण गटाच्या दोन सदस्यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या काश्मीर टायगर्स या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हत्या केल्यानंतर पीडितांच्या मृतदेहाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांचे फोटोही शेअर केले.

नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी हत्या झालेल्या दोघा सदस्यांची नावे असून ते ओहली कुंटवारा गावचे रहिवासी आहेत. दोघेही गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असताना दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. अद्याप दोघांचे मृतदेह सापडलेले नाहीत. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतरांनी या हत्येचा निषेध केला आहे.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी देखील आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या हत्येचा निषेध केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अशा प्रकारच्या हिंसक घटना अडथळा ठरत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले… CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्याचा आरोप शिंदे यांनी केला. एक दिवसापूर्वी...
याला कसलाच नाही पश्चाताप, जयदीप आपटेचा कांगावा कमी होईना, म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यामुळे कोसळला, जामिनासाठी घेतली हायकोर्टात धाव
दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल शाहरुख खानकडून धक्कादायक खुलासा, ‘अचानक गाणं वाजू लागलं आणि…’
“मी कधीच घाबरून काम केलं नाही, कारण मी हिंदू..”; धर्मावरून खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकली एकता कपूर
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; केदारचं सत्य सर्वांसमोर येणार?
देवाभाऊ, पुरेशा पाण्याचा वायदा किती वेळा देणार? मतदारांचा सवाल; 5 वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा
ईडीच्या भीतीनंच पलायन; प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून पक्ष, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! – संजय राऊत