जपानमध्ये न्यायव्यवस्था स्वतंत्र, जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक मुंबईत
जपानच्या राजकारणात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि न्यायव्यवस्था हे स्वतंत्र आहे. जपानी राजकारणात निवडणूक प्रचार काळात सामान्य माणसांना अधिक प्राधान्य देण्यात येते आणि सकाळी नऊ ते दुपारी तीन यावेळेतच निवडणूक प्रचार करण्यात येतो अशी माहिती जपानमधील हिंदुस्थानी वंशाचे पहिले आमदार योगेंद्र पुराणिक यांनी आज दिली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक यांच्याशी वार्तालपाचे आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, प्रविण पुरो व अन्य सदस्य उपस्थित होते.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जपानमधील निवडणूक प्रचार प्रक्रियेची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, या प्रचारा दरम्यान रॅलीत जास्तीत जास्त स्वयंसेवकांना परवानगी नसते. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीलाही मज्जाव केला जातो. कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या आकाराचे बॅनर लावायचे हे निश्चित करुन दिले जाते. त्या आकारातच भीतीपत्रक लावावे लागतात. प्रचाराची वेळ ही सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंतच असते. या प्रचारात स्पीकर लावता येत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हिंदुस्थान युवकांचा देश
जपान सारख्या देशाचा जन्म दर खूपच कमी आहे. सध्या 0.63 टक्के असा येथील जन्म दर आहे. त्यामुळेच जपानला म्हाताऱ्यांचा देश म्हटले जाते. त्याउलट हिंदुस्थान युवकांचा देश म्हटले जाते. हिंदुस्थानात पूर्वी 20 व्या वर्षी लग्न व्हायचे, मात्र आता लग्नाचे वय हे 25 ते 30 व्या वर्षात पोहचले आहे. त्यामुळे विकासित देशांच्या मुलांचा जन्म दराबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत योगेंद्र पुराणिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List