म्हणे, पुतळा कोसळून कुणाला दुखापत झाली नाही!मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, शिल्पकार जयदीप आपटे जामिनासाठी हायकोर्टात

म्हणे, पुतळा कोसळून कुणाला दुखापत झाली नाही!मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, शिल्पकार जयदीप आपटे जामिनासाठी हायकोर्टात

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या शिल्पकार जयदीप आपटेने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुतळा कोसळून कोणत्याही व्यक्तीला शारीरिक दुखापत झालेली नाही. एफआयआरमध्ये तसा कुठे आरोप नाही. जोरदार वाऱयामुळेच पुतळा कोसळला, असा दावा आपटेने जामीन अर्जात केला आहे.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या जयदीप आपटेने सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता तो अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याच्यातर्फे अॅड. गणेश सोवनी यांनी अर्ज केला आहे. त्या अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी आपटेच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि सरकारी पक्षाला नोटीस जारी करून 12 नोव्हेंबरला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. राजकोट किल्ला परिसरात उभारलेला शिवपुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीचे निकृष्ट काम उघड झाल्यानंतर जयदीप आपटेला 4 सप्टेंबर रोजी कल्याणमधून अटक केली होती.

जामीन अर्जातील दावे

मालवणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना सोसाटय़ाच्या वाऱयामुळेच घडली आहे. आपल्याला यात नाहक गोवले असून या घटनेला कोणतेही मानवी कृत्य जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

पुतळा उभारणीचे काम दिलेल्या ‘नेव्हल डॉकयार्ड’ने इन्स्पेक्शन केल्यानंतर कामात त्रुटी असल्याची कुठलीही तक्रार केली नव्हती, मात्र दुर्घटना घडल्यानंतर तांत्रिक तज्ञ नसलेल्या पीडब्ल्यूडी इंजिनीअरने नऊ तासांत एफआयआर दाखल केला.

28 मे 2023 रोजी मध्य प्रदेशातील महाकाल उज्जैनमध्ये सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसामुळे सातपैकी सहा पुतळे कोसळले होते. त्यावेळी तेथील सरकारने पुतळे कोसळण्याच्या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश दिले होते. तशाच प्रकारे मालवणातील घटनेप्रकरणी तज्ञांच्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतरच गुन्हा दाखल केला पाहिजे होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ajit Pawar : महायुतीपेक्षा अजितदादांचा सूर का वेगळा? योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ विधानावर हल्ला तर बारामतीमधील प्रचारात का नको मित्रांचा गोतावळा? Ajit Pawar : महायुतीपेक्षा अजितदादांचा सूर का वेगळा? योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ विधानावर हल्ला तर बारामतीमधील प्रचारात का नको मित्रांचा गोतावळा?
राज्यात प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर भाजपाने त्यांचा फायरब्रँड...
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन; वयाच्या 35 व्या वर्षी केली आत्महत्या?
‘आई कुठे काय करते’च्या निरोपाचे क्षण जवळ येताच मधुराणी भावूक; म्हणाली “मालिका संपली तरी..”
सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, रात्रीच्या सुमारास फोन आला आणि…
गायकाच्या हत्येनंतर आईने 58 व्या वर्षी दिला दुसऱ्या मुलाला जन्म, फोटो शेअर करत म्हणाले…
चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला भूखंडाची खिरापत भोवणार, लोकायुक्तांनी तक्रारीची घेतली गंभीर दखल
भाजपचा हा विचार म्हणजे डॉ आंबेडकरांचा अपमान, राहुल गांधी यांची देवेंद्र फडणवीस यांची टीका