स्वावलंबी महाराष्ट्र! सर्वोत्तम महाराष्ट्र!! शिवसेनेचा वचननामा; महिलांना वाढीव निधी, प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचा विमा

स्वावलंबी महाराष्ट्र! सर्वोत्तम महाराष्ट्र!! शिवसेनेचा वचननामा; महिलांना वाढीव निधी, प्रत्येक कुटुंबाला  25 लाखांचा विमा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा आज जाहीर केला. या वचननाम्यामध्ये महिला, तरुण पिढी, शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका अशा सर्वच घटकांना न्याय देण्यात आला आहे. महिलांना सुरक्षेबरोबरच सरकारी अर्थसहाय्य वाढवले जाणार आहे. मुलामुलींना मोफत शिक्षणाबरोबरच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही वचन शिवसेनेने यात दिले आहे.

पॉकेटसाईज वचननामा…

शिवसैनिक गावागावांत जाऊन निवडणुकीचा प्रचार करताना हा वचननामा जनतेपर्यंत पोहोचवतील. त्यासाठी सर्वांना समजेल असा पॉकेटसाईज वचननामाही बनवण्यात आला आहे. त्यावर क्यूआर कोडही देण्यात आला आहे. तो स्पॅन केल्यानंतर वचननामा मोबाईल फोनवरही पाहता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन केले. जनतेच्या चरणी हा वचननामा ठेवत आहोत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जनतेची सेवा कशी करणार त्याचा हा वचननामा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीही दिलेली आश्वासने 90 टक्के पूर्ण केली आहेत असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारचाही समाचार घेतला. मिंधे सरकारने फक्त गद्दारांना नोकऱया दिल्या. शिवसेना तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुलींबरोबर मुलांनाही मोफत शिक्षण देऊ याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.

कुटुंबप्रमुखांचा वचननामा

कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांमुळे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने कुटुंबप्रमुख मानले. त्यामुळे हा कुटुंबप्रमुखांचा वचननामा आहे असा उल्लेख शिवसेनेच्या वचननाम्यावर करण्यात आला आहे. जनतेच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने महाराष्ट्राचे वैभव पुन्हा मिळवून देईन असा शब्दही त्यांनी दिला आहे.

आम्ही मते मागायची आणि लोकांनी मते द्यायची हे मला पटत नाही. आम्हाला मते का द्यायची यासाठी हा वचननामा जनतेला देत आहोत. महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा 10 नोव्हेंबरला प्रकाशित होईल, परंतु मुंबईबाहेर असल्याने कदाचित आपल्याला त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असे कुणी समजू नये, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना नेते-माजी मंत्री सुभाष देसाई, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते.

मिंध्यांनी खाल्लेले पैसे रोखले तर सर्व योजना राबवता येतील

निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष मतदारांना आश्वासनांची रेवडी देत आहे. इतक्या योजना राबवण्यासाठी पैसा कुठून आणणार असे माध्यमांनी या वेळी विचारले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही पूर्ण अभ्यास करूनच ही वचने दिली आहेत. पैसा कुठून आणणार हे आताच सांगितले तर शिवसेना आणि धनुष्यबाण चोरला तशी ती आयडियाही मिंधे चोरतील. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवणार असे शिवसेनेने सांगितले ते आश्वासनसुद्धा मिंध्यांनी चोरले. त्यांना चोरीशिवाय दुसरे काहीच येत नाही असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मिंधे सरकारने जितका पैसा ज्या पद्धतीने खाल्ला ते प्रकार रोखले गेले तर सर्व काही शक्य आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मोदी सरकार पंधरा लाख देणार होते, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. आजपर्यंत ते काही करू शकले नाहीत, ते आता कसे करणार? ती रेवडीच होती, ते जुमलेच होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अच्छे दिन कब आयेंगे…ये जायेंगे तो आयेंगे, अशी मिश्किलीही त्यांनी केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱयात म्हणाले, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते भारतीय जनता पक्षाबद्दल बोलत होते. कारण भाजपची नाव आता बुडायला लागली आहे. म्हणून ते भाजपच्या लोकांना म्हणाले की, ते एकत्र असतील तर सेफ आहेत, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.

कंत्राटदारांना पैसे मिळावेत म्हणून राज्यावर कर्ज

महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार आहात. आधीच लाखो कोटी रुपये कर्ज राज्य सरकारवर आहे, मग योजनांमध्ये फेरबदल करणार का? असा प्रश्न या वेळी माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, पंत्राटदारांना पैसे मिळावेत आणि पंत्राटदारांच्या माध्यमातून मिंध्यांना मिळावेत म्हणून ते कर्ज झालेय. मिंधे सरकारने महापालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवीही तोडल्या. महाविकास आघाडी सरकारने त्या ठेवींमधून कोस्टल रोड केला होता. आमचे सरकार पाडल्यानंतर मोदींची सभा झाली होती. त्यात ते म्हणाले होते की, बँकांमध्ये पैसा ठेवून विकास होत नाही, तो आपल्या मित्रांच्या खिशात गेला पाहिजे. त्यामुळे मिंधे सरकारने रस्त्यांची कामे, मेट्रोची कामे काढली. नियोजनशून्य विकास केला. त्यासाठी बेसुमार पंत्राटे काढली गेली. काही ठिकाणी तर पंत्राटाशिवाय पैसे दिले गेले. धारावीचा प्रकल्पही मुंबईच्या मुळावर येणारा प्रकल्प आहे. तो केवळ धारावीपुरता आहे असे समजू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

माहीम शिवसेनेचाच आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत असलेल्या माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची एकही सभा का नाही? असा प्रश्नही पत्रकारांनी केला. त्यावर माहीम हा माझा आहे, शिवसेनेचा मतदारसंघ आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कालची महाविकास आघाडीची सभा आणि 17 नोव्हेंबरची सभा यादरम्यान बघितले तर माझ्या सभा बाहेरच आहेत. कारण मुंबईकरांवर माझा विश्वास आहे आणि मुंबईकरांचा माझ्यावर विश्वास आहे. महाराष्ट्राचाही माझ्यावर विश्वास आहे. तरीदेखील मी सर्वांच्या दर्शनाला आणि आशीर्वादासाठी जातोच आहे. एके ठिकाणी गेलो आणि एके ठिकाणी गेलो नाही म्हणजे मी दुर्लक्ष करतोय असे नाही. आता दिवसाला चार-पाच सभा घेतल्या तरी सर्व मतदारसंघ पूर्ण करता येणार नाहीत. प्रवासाचा वेळ आणि उन्हाच्या वेळा पाहिल्या तर रोज चार सभांच्या वर जास्त सभा होतील असे मला वाटत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

धारावीबाबतचा सरकारचा डाव हाणून पाडणार

धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर एक बकालपणा आणण्याचा सरकारचा डाव आहे. तोदेखील महाविकास आघाडीचे सरकार हाणून पाडेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धारावीमध्ये चार-पाच लाख वस्ती असेल. त्यातले अर्धेअधिक अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायचे, दहिसर किंवा मिठागरांच्या ठिकाणी पाठवायचे असे सरकारचे चालले आहे. त्यासाठी हजारो एकर जमीन अदानींना दिलेली आहे आणि तसे आदेश निघालेले आहेत. मिंधे सरकारचा तो डाव आमचे सरकार आल्यानंतर हाणून पाडू, असे उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रकाशनावेळी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. कोळीवाडे आणि गावठाणांचे अस्तित्व पुसून तिथे क्लस्टर करण्याचा सरकारने काढलेला जीआरही रद्द करू, असेही ते म्हणाले.

शिवसेना करणार आहे तेच बोलते

महाविकास आघाडीचा वचननामा काही दिवसांत येईलच, पण स्वतंत्र वचननामा आणला म्हणून शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली असे मुळीच नाही. युतीमध्ये होतो तेव्हाही शिवसेनेने स्वतःचा वचननामा आणला होता असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. शिवसेनेच्या वचननाम्यात हवेतल्या गोष्टी नाहीत, तर शिवसेना नेहमी करणार आहे तेच बोलते आणि बोलते तेच करते असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

मागील अडीच वर्षे महाराष्ट्र अराजक अनुभवत आहे. शेती उजाड, तर गावे भकास झाली आहेत. शहरे बकाल होत आहेत. गावात काय महाराष्ट्रात कुठेही रोजगाराच्या संधी सापडत नाहीत. या दलदलीतून महाराष्ट्राला बाहेर काढावेच लागेल. त्यादृष्टीनेच ही वचने दिली आहेत. जनतेने त्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद द्यावा.

अदानीला आंदण दिलेली मुंबईतील जमीन परत घेऊन मुंबईच्या विविध भागांमध्ये एक लाख भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचे घर किफायतशीर दरात देणार.

  • धारावीकरांना त्यांच्या उद्योग-व्यवसायासाठी हक्काच्या सुविधांसह जिथल्या तिथे घर देणारी नवीन निविदा काढणार.
  • कष्टकऱ्यांना फक्त 10 रुपयांत पोटभर, पौष्टिक जेवण देणाऱया शिवभोजन योजनेचा विस्तार करणार.
  • सरकारी कर्मचाऱयांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
  • महिलांना एसटी तसेच बेस्ट, टीएमटी, पीएमपीएमएल, एनएमएमटी आदींमध्ये बस प्रवास मोफत करणार. महिलांना लोकल ट्रेनमधून मोफत प्रवासासाठी पेंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार.
  • प्रत्येक जिह्यात दर तीन महिन्याला रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

म्हणे, पुतळा कोसळून कुणाला दुखापत झाली नाही!मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, शिल्पकार जयदीप आपटे जामिनासाठी हायकोर्टात म्हणे, पुतळा कोसळून कुणाला दुखापत झाली नाही!मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, शिल्पकार जयदीप आपटे जामिनासाठी हायकोर्टात
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या शिल्पकार जयदीप आपटेने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव...
आदित्य ठाकरे यांच्या आज नांदगाव, देवळाली, नाशिक पश्चिममध्ये जाहीर सभा
जम्मू–कश्मीर विधानसभेत गदारोळ, 370 कलमावरून आमदारांची हाणामारी
सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल
राहुल गांधींचे तोंड बंद करण्यासाठी भाजप त्यांच्यावर खोटय़ा केसेस टाकतोय
स्वावलंबी महाराष्ट्र! सर्वोत्तम महाराष्ट्र!! शिवसेनेचा वचननामा; महिलांना वाढीव निधी, प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचा विमा
महाराष्ट्राचे वैभव पुन्हा मिळवून देणार, शिवसेनेचा वचननामा