भाजपचा हा विचार म्हणजे डॉ आंबेडकरांचा अपमान, राहुल गांधी यांची देवेंद्र फडणवीस यांची टीका
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानुसार संविधान दाखवणं आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी करणे म्हणजे नक्षलवादी विचार आहे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र हा अपमान कदापि सहन करणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले
एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राचे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दाखवणं आणि जातीनिहाय जनगणनेची मागी करणे म्हणजे नक्षलवादी विचार आहे. भाजपचा हा विचार संविधानाचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पुत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने संविधानाची लढाई लढली आणि महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला.
तसेच भाजपने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे आणि महाराष्ट्राची जनता हे कदापि सहन करणार नाही असे राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्राची जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत मिळून संविधानावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार आणि संविधानाचे रक्षण करणार आणि भाजपचे सर्व प्रयत्न हाणून पाडणार. लिहून घ्या जातीनिहाय जनगणना होणारच असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र के भाजपा के पूर्व मुख्यमंत्री के अनुसार बाबासाहेब के संविधान को दिखाना और जाति जनगणना के लिए आवाज़ उठाना नक्सली विचार है! भाजपा की ये सोच संविधान निर्माता महाराष्ट्र के सपूत डॉ भीमराव आंबेडकर का अपमान है।
लोकसभा चुनाव के दौरान महाराष्ट्र की जनता ने संविधान की लड़ाई…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 7, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List