मुलुंडमध्ये हृदयद्रावक घटना, कारमध्ये अडकल्याने पाच वर्षाच्या मुलाचा गुदमरून मृत्यू

मुलुंडमध्ये हृदयद्रावक घटना, कारमध्ये अडकल्याने पाच वर्षाच्या मुलाचा गुदमरून मृत्यू

कारमध्ये अडकल्याने पाच वर्षाच्या मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. कबीर कनौजिया असे मयत मुलाचे नाव आहे. खेळता खेळता मुलगा कारमध्ये घुसला. मात्र दरवाजा खोलता न आल्याने तो आत गुदमरला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

कबीरचे वडील अर्जुन कनोजिया यांचे पान शॉप आहे. गुरुवारी दुपारी कबीर वडिलांच्या दुकानाजवळ खेळत होता. यादरम्यान त्याला शौचास आली. वडिलांनी त्याला शौचास जाण्यास सांगून ते दुकानात झोपले होते. जाग आली तेव्हा कबीर बेपत्ता असल्याचे लक्षात आले.

वडिलांनी सर्वत्र कबीरचा शोध सुरू केला. आसपासच्या परिसरात शोध घेतला असता दुकानाजवळ उभ्या असलेल्या होंडा सिटी कारमध्ये कबीर बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ वीर सावरकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Poonam Mahajan : महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल; पूनम महाजन यांचा रोख कुणाकडे? खासदारकीचे तिकीट कापल्याबद्दल जाहीर नाराजी Poonam Mahajan : महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल; पूनम महाजन यांचा रोख कुणाकडे? खासदारकीचे तिकीट कापल्याबद्दल जाहीर नाराजी
महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. त्यातच भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी ऐन या धामधुमीत...
दोघी बहिणी एकाच क्षेत्रात,तरीही भेटत नाही; विद्या बालनच्या सुपरस्टार बहिणीने सांगितलं कारण
आईपेक्षा अधिक ग्लॅमरस करिश्मा कपूरची लेक, हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क
‘एका महिन्यात मारून टाकणार…’, सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीकडून मोठा खुलासा
लग्नानंतर बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मोडले संसार
प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने आजार दूर होतात; जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल
हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होतो? रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली? मग ‘हे’ उपाय नक्की करा