5 हजार मतदारांचे दोन वर्षांत चौथ्यांदा मतदान, तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील 14 गावांना दुहेरी मताधिकार
महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. येत्या 20 नोव्हेंबरला 288 मतदारसंघांत एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. राजकीय पक्षांकडून जोर, बैठका वाढल्या आहेत, परंतु तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेवरील 14 गावांतील 5 हजार मतदार हे दोन वर्षांत चौथ्यांदा मतदान करणार आहेत. या गावांतील मतदारांनी याआधी तेलंगणा विधानसभा, तेलंगणा लोकसभा आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. आता हे मतदार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा हक्क बजावताना दिसतील. संपूर्ण देशात मतदानाचा हक्क फक्त एकदाच असताना या 14 गावांतील नागरिक मात्र चार-चार वेळा मतदानाचा हक्क बजावत आहेत. सीमावादात दोन्ही राज्यांची सरकारे या गावांवर आपला हक्क सांगतात आणि येथील लोकही दोन्ही सरकारच्या योजनांचा लाभ घेतात.
– यापूर्वी 30 नोव्हेंबर 2023 रोजी तेलंगणातील आसिफाबाद मतदारसंघासाठी मतदान केले होते. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान केले होते.
– 2 हजार 781 पुरुष आणि 2,512 महिला असे एकूण 5,293 मतदार मतदान करणार आहेत. मतदान करणारी 14 गावे महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या सीमेवरील जिवती तालुक्यातील आहेत.
– दोन वर्षांत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत तीनदा मतदान केल्यानंतर हे मतदार आता महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List