विकास आराखड्यात नागरिकांच्या मागण्यांचाही विचार करावा!
केवळ टोलेजंग इमारती किंवा भव्य रस्ते म्हणजेच विकास नव्हे तर नागरिकांना गुणवत्तापूर्ण मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. केवळ विकास आराखडा तयार करून विकास नियोजन अभियंत्यांची जबाबदारी संपत नाही तर त्याची अंमलबजावणी होऊन शहराला राहण्यायोग्य बनवणे हीसुद्धा त्यांची जबाबदारी आहे. विकास आराखडा बनवताना सुविधांच्या उपलब्धतेसोबतच नागरिकांच्या मागण्यांचाही विचार करावा, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या.
विकास नियोजन विभागाच्या कामकाजाचा आयुक्तांनी पालिका मुख्यालयात आज आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला विकास नियोजन विभागाचे कामकाज, विकास आराखडा, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उपलब्ध जागा आणि त्यावरील आरक्षण, विकास आरखडा विभागाच्या गरजा आणि अडचणी आदींबाबत सादरीकरण करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List