शस्त्रे पुरवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आठ जणांना बेड्या, वसई गुन्हे शाखा-2च्या पथकाची कारवाई
महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शस्त्रसाठा पुरवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा वसई गुन्हे शाखा-2च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीतील आठ जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून नऊ गावठी पिस्तूल, 21 जिवंत काडतुसे व पाच मोबाईल असा 3 लाख 83 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले आठही जण हे गुजरात आणि उत्तर प्रदेशातील रहिवाशी असून या टोळीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास वसई पोलीस करीत आहेत.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम वसई पोलिसांनी हाती घेतली. त्या वेळी कोळीवाडा ते सुरुची बाग रोडवरील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील तरुणाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोईन ऊर्फ जिलेबी सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे सापडली होती. त्याने पिस्तूल गुजरात व उत्तर प्रदेशातील टोळीकडून घेतल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी विविध पथके तयार करून शस्त्रसाठा पुरवणाऱ्या आठ जणांच्या मुसक्या आवळल्या.
ही आहेत आरोपींची नावे
मोईन ऊर्फ युनूस ऊर्फ जिलेबी सय्यद, जावेद खान, मोहम्मद आरीफ ऊर्फ शाहरुख खान, अंकित निशाद ऊर्फ अंकित पटेल, अमित निशाद, अमितकुमार निशाद, आलम ऊर्फ अलीम खान आणि देवा प्रजापती अशी अटक केलेल्या आठ जणांची नावे आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List