शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं, शिंदे मोदी-शहांच्या पायाशी गहाण; संजय राऊत यांचा घणाघात

शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं, शिंदे मोदी-शहांच्या पायाशी गहाण; संजय राऊत यांचा घणाघात

एकनाथ शिंदे हे मोदी, शहांच्या पायाशी गहाण पडलेले आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शुक्रवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या गप्पा एकनाथ शिंदे यांनी मारू नयेत. मोदी, शहांच्या कृपेने त्यांनी धनुष्यबाण हातात घेतला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणासह एकनाथ शिंदे मोदी, शहांच्या पायाशी गहाण पडलेले आहेत, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.

ईडीच्या भीतीने अनेकांनी पक्षांतर केले. पण आमच्यासारख्या लोकांचे अख्खे आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेले. आम्ही तोंडावर सांगितलेले आहे की, मरण पत्करू पण शरण जाणार नाही. पण काही कमजोर हृदयाचे लोक असतात. शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

ते प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मोदींसोबतच

सत्ता द्या, मशि‍दीवरून भोंगे उतरवू असे राज ठाकरे म्हणाले. त्यांचा हा भोंगा आम्ही 20-25 वर्ष ऐकतो आहोत. यासाठी सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोदी, शहा, फडणवीसांबरोबर आहात म्हणजे सत्तेबरोबर आहात. सत्ता येईल, नाही येईल हा पुढचा प्रश्न, पण एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असतो त्यासाठी सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेली 50-55 वर्ष कोणत्याही सत्तेशिवाय अनेकदा आपले अनेक कार्यक्रम राबवले आहेत, असेही राऊत म्हणाले.

ईडीच्या भीतीनंच पलायन; प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून पक्ष, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! – संजय राऊत

…तर संघर्ष होण्याची शक्यता

17 नोव्हेंबर हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवाजी पार्कावर लोक येतील. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेलाच परवानगी मिळायला पाहिजे होती. पण एक दिवस आधी अर्ज दुसऱ्या पक्षाने दिला म्हणून त्यांना ती जागा मिळतेय. संध्याकाळी त्यांची सभा आणि दिवसभर तिथे आमचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या चाहत्यांचा राबता असेल, म्हणजे तिथे त्यांना अडवले जाईल. तसे झाले तर तिकडे खरोखर संघर्ष होण्याची शक्यता वाटते. म्हणून प्रशासनाने वेळीच त्याच्यावरती पावले उचलणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Poonam Mahajan : महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल; पूनम महाजन यांचा रोख कुणाकडे? खासदारकीचे तिकीट कापल्याबद्दल जाहीर नाराजी Poonam Mahajan : महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल; पूनम महाजन यांचा रोख कुणाकडे? खासदारकीचे तिकीट कापल्याबद्दल जाहीर नाराजी
महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. त्यातच भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी ऐन या धामधुमीत...
दोघी बहिणी एकाच क्षेत्रात,तरीही भेटत नाही; विद्या बालनच्या सुपरस्टार बहिणीने सांगितलं कारण
आईपेक्षा अधिक ग्लॅमरस करिश्मा कपूरची लेक, हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क
‘एका महिन्यात मारून टाकणार…’, सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीकडून मोठा खुलासा
लग्नानंतर बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मोडले संसार
प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने आजार दूर होतात; जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल
हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होतो? रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली? मग ‘हे’ उपाय नक्की करा