चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला भूखंडाची खिरापत भोवणार, लोकायुक्तांनी तक्रारीची घेतली गंभीर दखल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या महालक्ष्मी जगदंबा संस्थेला पाच एकर भूखंड देणे मिंधे सरकारच्या चांगलेच अंगलट आले आहे. मिंधे सरकारच्या या निर्णयाविरोधात लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत लोकायुक्त यांनी महसूल विभाग व नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला देत अ‍ॅड. किसन चौधरी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून राज्य शासनाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड दिला. याच्या सखोल चौकशीचे आदेश लोकायुक्त यांनी द्यावेत. या भूखंडाचा ताबा राज्य शासनाने परत घ्यावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली व 3 जानेवारी 2025 पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव व नागपूर जिल्हाधिकारी यांना दिले.

वित्त विभाग, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा विरोध

नर्सिंग कॉलेज, ज्युनिअर महाविद्यालय, सायन्स-आर्ट्स-कॉमर्स कॉलेज व स्किल डेव्हल्पमेंट सेंटर उभारण्यासाठी भूखंड द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज 29 नोव्हेंबर 2023 रोजी संस्थेने राज्य शासनाकडे केला होता. महसूल विभागाने हा अर्ज वित्त विभागाकडे पाठवला. वित्त विभागाने भूखंड देण्यास थेट नकार कळवला होता. उच्च व तंत्र शिक्षणाचा संस्थेला दीर्घ अनुभव नाही. थेट भूखंड द्यावा एवढी ही संस्था प्रसिद्ध नाही, असा शेरा वित्त विभागाने मारला होता. ही संस्था वंचित व अपंगांसाठी काम करते. हे काम अधूनमधून केले जाते. त्यासाठी भूखंड देण्याची गरज नाही, असा अहवाल नागपूर जिल्हाधिकारी यांनी दिला होता. त्याचा संदर्भही वित्त विभागाने दिला होता. तरीही हा भूखंड बेकायदेशीरपणे संस्थेला दिल्याचा आरोप वृत्तपत्रातील बातमीच्या आाधारे तक्रारीत करण्यात आला आहे.

अजेंडा नसताना घेतला निर्णय

23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा कोणताही अजेंडा नव्हता. तरीदेखील हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही व भूखंड संस्थेला बहाल करण्याला मंजुरी देण्यात आली.

चार कोटींचा भूखंड

नागपूर येथील मौजे कोराडी, तालुका कामठी येथील या भूखंडाची रेडी रेकनरप्रमाणे किंमत 4.8 कोटी आहे. रीतसर भूखंडाचा लिलाव करून सरकारी तिजोरीत चांगली रक्कम आली असती. तसे न करता हा भूखंड चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला देण्यात आला. हा भूखंड संस्थेला दिल्याचा निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. माहिती अधिकारात याची माहिती मागवली आहे. या प्रक्रियेत 30 दिवस जातील. त्यामुळे ही तक्रार केली जात आहे, असेही अ‍ॅड. चौधरी यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले… CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्याचा आरोप शिंदे यांनी केला. एक दिवसापूर्वी...
याला कसलाच नाही पश्चाताप, जयदीप आपटेचा कांगावा कमी होईना, म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यामुळे कोसळला, जामिनासाठी घेतली हायकोर्टात धाव
दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल शाहरुख खानकडून धक्कादायक खुलासा, ‘अचानक गाणं वाजू लागलं आणि…’
“मी कधीच घाबरून काम केलं नाही, कारण मी हिंदू..”; धर्मावरून खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकली एकता कपूर
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; केदारचं सत्य सर्वांसमोर येणार?
देवाभाऊ, पुरेशा पाण्याचा वायदा किती वेळा देणार? मतदारांचा सवाल; 5 वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा
ईडीच्या भीतीनंच पलायन; प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून पक्ष, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! – संजय राऊत