पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न, तहसिलदार पतीला अटक
पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिच्या पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तहसिदाराला अटक केली आहे. अविनाश श्रीराम शेंबटवार असे अटक केलेल्या तहसिलदाराचे नाव आहे. शेंबटवार याच्यासह त्याच्या नातेवाईकांविरोधातही गुन्हा दाखर करण्यात आला आहे.
शेंबटवार याचं दोन वर्षापूर्वी नांदेडमधील मगनपुरा परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न झाले असून सध्या तो गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होता. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, लग्नात पत्नीला माहेरून 25 तोळे सोने देण्यात आले होते. त्यानंतर तगादा लावून शेंबटवार याने पत्नीच्या आई-वडिलांकडून 75 लाख रुपये घेतले. यानंतरही पीडितेचा त्रास सुरूच होता.
पत्नीला मारहाण करणे, जादूटोणाचा वापर करणे, पिस्तुल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विविध प्रकारे छळ करणे हे प्रकार सुरुच होते. अखेर या त्रासाला कंटाळून पीडिता नांदेड येथे आपल्या माहेरी आली. यानंतर 11 मार्च रोजी पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी तहसिलदाराविरोधात गुन्हा दाखल केला.
शनिवारी रात्री तहसिलदार पीडितेच्या माहेरी आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी मगनपुरा भागात जाऊन तहसिलदार अविनाश शेंबटवार याला अटक केली. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा, विवाहितेचा छळ करणे, नरबळी व इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा आणि जादूटोणा करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी सासरे श्रीराम शेंबटवार, सासू पुष्पा शेंबटवार, दिर अमोल शेंबटवार यांच्याविरुध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List