पहलगाम दहशतवादी हल्ल्याची करणार NIA चौकशी, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आदेश
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चौकशी करेल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून एनआयए टीम, ज्यामध्ये फॉरेन्सिक टीम आणि तपास पथकाचा समावेश आहे, गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित आहे. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
गृह मंत्रालयाने सूचना जारी केल्यानंतर, एनआयएने या प्रकरणात अधिकृतपणे गुन्हा दाखल केला आहे. आता एनआयए या प्रकरणाची चौकशी करेल आणि जम्मू आणि कश्मीर पोलिसांसह इतर तपास यंत्रणा एनआयएला मदत करतील. पीटीआयच्या वृत्तानुसार, एनआयएचे पथक पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना भेटून पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहे. एनआयएच्या विशेष पथकांनी दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List