Iran Blast – इराणमधील राजाई बंदरात भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू; 500 हून अधिक जण जखमी
इराणच्या बंदरगाहमध्ये राजाई बंदरात शनिवारी भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर बंदरात आग लागली. या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला असून 516 जण जखमी झाले आहेत. इराणच्या राष्ट्रीय आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते बाबक यक्तपरस्त यांनी दुर्घटनेची पुष्टी केली. जखमींना उपचारासाठी विविध दाखल करण्यात आले आहे.
राजाई बंदरातील कंटेनरमुळे हा स्फोट झाल्याचे प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मेहरदाद हसनजादेह यांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात येत आहे.
राजाई बंदरातून प्रामुख्याने कंटेनर ट्रॅफिक कंट्रोल केले जाते. बंदरात तेलाच्या टाक्या आणि पेट्रोकेमिकल युनिट्स असल्याने आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. या स्फोटामुळे प्रादेशिक व्यापार आणि पुरवठा साखळीवरही मोठा परिणाम झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List