कार निर्यातीत जगात ‘जर्मनी’ टॉप, टॉप 25 च्या यादीत हिंदुस्थान 23 व्या स्थानी
ऑटोमोबाईल इंडस्ट्री जगभरात सर्वात मोठी इंडस्ट्रीपैकी एक बनली आहे. अनेक देशांची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. संपूर्ण जगभरात कार निर्यात करण्यामध्ये जर्मनी जगात एक नंबरवर आहे. त्यापाठोपाठ जपान या देशाचा नंबर लागतो. चिनी कारची डिमांडसुद्धा झपाटय़ाने वाढत आहे. जर्मनीच्या कारला जगभरात मागणी आहे. जर्मनीतील मर्सिडिज बेंज, बीएमडब्ल्यू आणि फॉक्सवेगन यांसारख्या कार ब्रँड्स जगभरात प्रसिद्ध आहेत, तर जपानच्या निसान, होंडा आणि टोयोटाच्या कारलासुद्धा जगभरात चांगली मागणी आहे. अमेरिकेतील फोर्ट आणि टेस्ला कार कंपन्या, साऊथ कोरियाच्या ह्युंदाई आणि किआच्या कार जगभरात पाहायला मिळतात. जगभरात कार एक्सपोर्ट करणाऱ्या टॉपच्या यादीत हिंदुस्थानचा नंबर 23 व्या स्थानी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List