निशिकांत दुबे यांच्या गुलमर्गमधील हाय-प्रोफाइल पार्टीची चर्चा! पहलगाम हल्ल्याआधी कडक सुरक्षेत पार पडला कार्यक्रम

निशिकांत दुबे यांच्या गुलमर्गमधील हाय-प्रोफाइल पार्टीची चर्चा! पहलगाम हल्ल्याआधी कडक सुरक्षेत पार पडला कार्यक्रम

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सुरक्षेत चूक झाल्याचे सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने मान्य केलं आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तेथे कोणतेही सुरक्षा दल तैनात नव्हते. दहशतवादी एकामागून एक पर्यटकांना लक्ष्य करत राहिले, मात्र त्यांना वाचवण्यासाठी तिथे एकही सुरक्षा रक्षक नव्हता. दुरीकडे एक नवीन माहिती समोर आली.

पहलगाम हल्ल्याच्या 10 दिवसआधी भाजपचे लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांनी गुलमर्गमध्ये कडक सुरक्षेत हाय-प्रोफाइल पार्टी केली. हा कार्यक्रम निशिकांत दुबे यांच्या 25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये कडक सुरक्षेत अनेक प्रमुख भाजप नेते सहभागी झाले होते. याबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिलं आहे. तसेच या हाय-प्रोफाइल पार्टीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरसारख्या संवेदनशील ठिकाणी अशी हाय-प्रोफाइल पार्टी आणि व्हीआयपी सुरक्षा प्रोटोकॉलबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहलगाम पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक नव्हता, मात्र निशिकांत दुबे यांची गुलमर्गमधील हाय-प्रोफाइल पार्टी कडक सुरक्षेत पार पडली. यातच सामन्यांच्या जीवाला काही किंमत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने
एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्यावरुन परळ-प्रभादेवी परिसरातील नागरिक एकवटले आहेत. येथील रहिवाशांना आमचे आधी पुनर्वसन करा आणि नंतर आम्हाला येथे हलवा...
कलाकारांच्या उपस्थिती मुंबईत रंगला ‘लाडकी बहीण चषक’; जिंकण्यासाठी संघांमध्ये चुरस
तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होईल तुमचे लिव्ह, त्या आजच बदला
हैदराबादचा चेन्नईवर दणदणीत विजय, 18 वर्षात पहिल्यांदाच भेदला चेपॉकचा अभेद्य गड
Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल
फळ विक्रेत्याच्या मुलाने अमिताभ बच्चनच्या घराजवळ सुरु केला 300 कोटींच्या आइस्क्रीमचा धंदा