मुंबईत पाणीप्रश्न ऐरणीवर! धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा; नागरिकांवर पाणीकपातीचं संकट

मुंबईत पाणीप्रश्न ऐरणीवर! धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा; नागरिकांवर पाणीकपातीचं संकट

मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याच्याच माऱ्याने मुंबईकर हैराण झाले असून वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 27 टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट निर्माण झालं आहे. उन्हामुळे एप्रिल महिन्यात मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये 15 टक्के पाण्याची घट झाली आहे. 14 मे पर्यंत हाच पाणीसाठा 10 टक्क्यांनावर येऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाणी जपून वापर असं आवाहन केलं जात आहे.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या सात धरणांत एकूण 3 लाख 88 हजार 971 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

25 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा

अप्पर वैतरणा – 27 टक्के

मोडक सागर – 24 टक्के

तानसा – 22 टक्के

मध्य वैतरणा – 32 टक्के

भातसा – 26 टक्के

विहार – 39 टक्के

तुळशी – 38 टक्के

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर
उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता जीवनशैलीबरोबरच योग्य आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो,...
एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने
कलाकारांच्या उपस्थिती मुंबईत रंगला ‘लाडकी बहीण चषक’; जिंकण्यासाठी संघांमध्ये चुरस
तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होईल तुमचे लिव्ह, त्या आजच बदला
हैदराबादचा चेन्नईवर दणदणीत विजय, 18 वर्षात पहिल्यांदाच भेदला चेपॉकचा अभेद्य गड
Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल