हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण

हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरणाच्या निर्णयाने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरून मनसेसह उद्धव ठाकरे शिवसेनेने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा निर्णय असा अचानक घेण्यामागील कारणांचा ऊहापोह केला. त्यांनी CBSC, ICSE शाळांमध्ये मराठी सक्ती करण्याची हिंमत आहे का? असा खडा सवाल त्यांनी केला आहे.

हिंदी आमच्यावर लादू नका

हिंदी आमच्यावर लादू नका, इतर ठिकाणी ही लादू नका. हिंदी सक्तीची करू नका. अनेक जण हिंदी बोलतात. पण तिची सक्ती करू नका तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. सीबीएसई, आयसीएसई सारख्या मोठ्या शाळेत मराठी सक्तीचा करा, ती तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

इतर भाषांवर सूड उगवू नका

हिंदी ही देशातील एक संवाद भाषा आहे. घटनात्मक वैधता नसली तरी सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. नरेंद्र मोदी यांना इंग्रजी येत नाही. अमित शाह यांना हिंदी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. त्यांचे हिंदी सुद्धा मोडकं तोडकं आहे, म्हणून त्याचा सूड इतर भाषांवर काढू नका. राज्यात हिंदी लागू करून ते या लोकांची सोय करत असल्याची टीका त्यांनी राज्य सरकावर केली.

महाराष्ट्रा सारख्या राज्यात खास करून मुंबईत हिंदी सिनेमा तयार होतो. या मुंबईतूनच, महाराष्ट्रातूनच हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, हिंदी लेखक मोठे झाले आहे. पृथ्वी थिएटर कुठे आहे? असा सवाल करत त्यांनी हिंदी येथे पूर्वीपासूनच असल्याचे सांगितले. पण हिंदी लादू नका असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी अगोदर माय मराठीकडे लक्ष द्यावे

मुख्यमंत्र्यांनी अगोदर माय मराठीकडे लक्ष द्यावे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. बेळगाव, धारवाड परिसरात मराठी भाषिकावर अत्याचार होत आहे. त्यावर ते कधी बोलले का? असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपाचे महाराष्ट्राच्या निर्मितीत कोणतेही योगदान नसल्याचा आरोप केला.

आताच का घेतला निर्णय?

हिंदी सक्तीचा निर्णय आताच का घेतला? यामागील कारणं त्यांनी सांगितली. मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सुरू असलेले हे पडद्यामागचे राजकारण असल्याचा घणाघात त्यांनी केला. कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो. मग कोणतरी त्या मागणी आधारे शिवाजी पार्कावर जाऊन एका नेत्याशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी एक मोठे ट्विट करण्यात येते. उठले कधी, केले कधी? असा टोला त्यांनी लगावला. ते ट्वीट सागर बंगल्यावरून अथवा कुठल्यातरी बंगल्यावरून तयार करून आलं होतं, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा