Bride Grooming- नवराई माझी लाडाची लाडाची गं.. लाडक्या नवरीसाठी हे स्पेशल राईस फेशियल! वाचा सविस्तर

Bride Grooming- नवराई माझी लाडाची लाडाची गं.. लाडक्या नवरीसाठी हे स्पेशल राईस फेशियल! वाचा सविस्तर

लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीसाठी खूप खास असतो. या दिवशी तिला सर्वात सुंदर दिसायचे असते, त्यामुळे या दिवसाची तयारी अनेक दिवस आधीपासूनच सुरू होते. लग्नापूर्वी, वधू पार्लरमध्ये जाते परंतु पार्लरमध्ये वारंवार जाऊन अनेकदा त्वचेचे नुकसान होते. केवळ इतकेच नाही तर, आपला खिसाही रिकामा होतो. अशावेळी नैसर्गिक चमक हवी असेल तर घरगुती उपाय सर्वोत्तम आहेत. तुम्ही वधू असाल तर, आजच राईस फेशियल करून पाहू शकता. या देसी फेशियलमुळे वधूची त्वचा चमकदार होईल. लग्नाच्या दिवशी तुम्हीही खूप सुंदर दिसाल.

राईस फेशियल करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घेऊया. या स्टेप्सच्या मदतीने करा राईस फेशियलमुळे त्वचेवर मस्त ग्लो येतो.

राईस फेशियल कसे करावे?
साहित्य
1 – वाटी तांदळाचे पीठ
2 – चमचे कोरफड जेल
1 – चमचा साखर
2 – चमचे गुलाबजल
1 – टीस्पून कॉफी

सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा. एका भांड्यात तांदळाचे पीठ, साखर आणि कॉफी घेऊन स्क्रबिंग करावे लागेल. लक्षात ठेवा तुम्हाला फक्त 5 मिनिटे स्क्रब करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ रुमाल पाण्यात बुडवा आणि तुमचा चेहरा स्वच्छ करा.

मालिश
आता तुम्हाला एका भांड्यात बारीक तांदळाचे पीठ घ्यावे लागेल आणि त्यात कोरफडीचे जेल, बेसन, गुलाबपाणी आणि ऑलिव्ह ऑइल मिसळावे लागेल. आता या सर्व गोष्टींची पेस्ट बनवा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर सुमारे 10-15 मिनिटे मसाज करा. यानंतर, तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवा.

फेस जेल
हे बनवण्यासाठी तुम्हाला तांदळाचे पीठ घ्यावे लागेल आणि त्यात कोरफडीचे जेल मिसळावे लागेल. आता या पेस्टने तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला 5 मिनिटे मसाज करावा लागेल.

फेस पॅक
शेवटी फेस पॅक बनवण्यासाठी, तुम्हाला एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन, दही, कोरफडीचे जेल आणि मध घ्यावे लागेल. आता हे सर्व चांगले मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. यानंतर तुम्हाला ते चेहऱ्यावर लावावे लागेल आणि कोरडे होऊ द्यावे लागेल. ते पूर्णपणे सुकल्यानंतर, साध्या पाण्याने चेहरा धुवा.

या स्टेप्सच्या मदतीने, वधू लग्नापूर्वी घरी राईस फेशियल करून त्वचेवर अनोखा ग्लो आणू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – जमिनीच्या वादातून हाणामारी, सहा जणांविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल Pune News – जमिनीच्या वादातून हाणामारी, सहा जणांविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल
शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या इचकेवाडी येथे जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संतोष बाळकृष्ण इचके यांनी...
चंद्रपूर @44.6°, देशातील सर्वोच्च तापमान तर जगात चौथ्या क्रमांकावर
त्याचे विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठीही छळ केला; टीम इंडियाच्या क्रिकेटपटूवर पत्नीचे गंभीर आरोप
लग्नमंडपाला पडदे लावताना वीजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
सलमानच्या घरी जशा गोळ्या झाडल्या, तशाच तुझ्या घरी… बिश्नोई गँगची आणखी एका अभिनेत्याला धमकी
तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाता? वेळीच व्हा सावध, संशोधनातून समोर आली भयंकर गोष्ट
Mumbai News – आयपीएल सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियममधून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरला, पोलिसांकडून चोराचा शोध सुरु