साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 एप्रिल 2025 ते शनिवार 26 एप्रिल 2025

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 एप्रिल 2025 ते शनिवार 26 एप्रिल 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – बेसावध राहू नका

चंद्र, मंगळ प्रतियुती, शुक्र शनि युती. नातेसबंध, मैत्री तुम्हाला टाळता येणार नाही. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेऊ नये. साडेसातीचे पर्व सुरू आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार कामे करून दाखवाल. स्पर्धा करणारे वाढतील. धंद्यात बेसावध राहू नका. मोह, व्यसन टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढवणारे प्रसंग येतील. शुभ दि. 21, 22

वृषभ – कामात चूक नको

चंद्र, बुध लाभयोग, शुक्र शनि युती. गोड बोलून कामे करून घ्यावी. अहंकार, संताप केल्यास अडचणी वाढतील. नोकरीच्या कामात चूक नको. धंद्यात लाभ, फसगत टाळा. वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. तुमच्या प्रतिष्ठेचा उपयोग बेकायदा कामासाठी होणार नाही याची काळजी घ्या. शुभ दि. 21, 22

मिथुन – नवे परिचय होतील

चंद्र, बुध लाभयोग, शुक्र शनि युती. विरोधक तुमच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त करतील. वाद, तणाव संपवण्याची तयारी ठेवतील. सप्ताहाच्या सुरूवातीला निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. नोकरीमध्ये बुद्धिचातुर्याची कमाल दाखवाल. थोरामोठय़ांचे परिचय होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. शुभ दि. 23, 25

कर्क – कामाचे कौतुक होईल

चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य चंद्र लाभयोग. संयम, सहनशीलता ठेवल्यास अनेक समस्या सोडवण्याचे मुद्दे शोधता येतील. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात नवा विक्रम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवाल. शुभ दि. 21, 25

सिंह – चौफेर सावध रहा

सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र शनि युती. क्षेत्र कोणतेही असो तणाव वाढवणारे वक्तव्य टाळा. कुणावरही पटकन विश्वास ठेऊ नका. अहंकाराने टीका होईल. नोकरीमध्ये कामात चूक टाळावी. धंद्यात सावध राहा. मोह, व्यसन नको. व्यवहारात फसगत होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. प्रश्न जटील होऊ शकतो. शुभ दि. 20, 23

कन्या – तटस्थ भूमिका घ्या

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र बुध लाभयोग. कोणताही प्रश्न सोडवताना तडजोडीचे धोरण ठेवा. दूरदृष्टिकोनातून निर्णय घ्या. नोकरीमध्ये क्षुल्लक तणाव जाणवेल. मित्र उपयोगी पडतील. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. इतरांचे मत ऐकून घ्या. योग्य संधीची वाट पहा. वाटाघाटीत गुप्त कारवाया होतील. शुभ दि. 21, 25

तूळ – तणाव जाणवतील

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. मैत्रीत, नात्यात क्षुल्लक तणाव जाणवतील. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेऊ नका. नोकरीमध्ये स्पर्धा करणारे वाढतील. वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात भावनेच्या भरात भलतेच आश्वासन देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 21, 25

वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा

चंद्र, मंगळ प्रतियुती, चंद्र, बुध लाभयोग. छोटय़ा कारणाने अस्थिर होऊन राग वाढवू नका. कुणालाही कमी लेखू नका. अहंकाराची भाषा शोभा देणार नाही. मैत्रीच्या नात्याने सर्वांशी वागा. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. नोकरीत नम्र रहा. धंद्यात वाढ, लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिस्पर्धी वरचढ होऊ शकतो. चातुर्य वापरा. शुभ दि. 20, 21

धनु – वर्चस्व वाढेल

सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, शनि युती. तुमच्या क्षेत्रातील समस्या सोडवता येतील. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीत वरिष्ठांच्या कामात साहाय्य केल्याने वर्चस्व वाढेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उजळेल. विरोधक मैत्रीची भाषा करतील. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दि. 21, 22

मकर – नोकरीत काम वाढेल

चंद्र, बुध लाभयोग, शुक्र, शनि युती. तुमचे कौतुक करून तुमच्यावर नवी जबाबदारी टाकण्यात येईल. गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नका. कलाक्षेत्रात कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. नोकरीत काम वाढेल. सहकारी मदत करतील. मात्र राग वाढू देऊ नका. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अभ्यासपूर्ण बोला. शुभ दि. 23, 24

कुंभ – नवा मार्ग मिळेल

सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, शनि युती. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा परिचय होईल. उत्साह, आत्मविश्वासात भर पडेल. प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. नोकरीच्या कामात बढती होईल. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जटील समस्या सोडवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. शुभ दि. 24, 25

मीन – गुंतवणूक वाढवा

शुक्र, शनि युती, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. तुमच्या धाडसाचे, कामाचे सर्वत्र कौतुक होईल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची नवी संधी मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल, बढती होईल. गुंतवणूक वाढवा. खरेदीविक्रीत फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उजळेल. पद, अधिकार यामुळे वर्चस्व वाढेल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. शुभ दि. 20, 21

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म