Pune News – कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली, झिपलायनिंग करताना 30 फूट उंचीवरून कोसळली; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
कुटुंबासोबत वॉटर पार्कला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणीचा 30 फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला. झिपलायनिंग करताना तरुणी पडली. पुणे-सातारा महामार्गावर वरवे खुर्द गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्कमध्ये ही घटना घडली. तरल अरुण आटपाळकर असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाळकर कुटुंबीय राजगड वॉटर पार्कला गेले होते. यावेळी तरल ही झिपलायनिंग करण्यासाठी गेली होती. रोपवरून चालत जाताना सुरक्षा दोर वरच्या बाजूच्या रेलिंगला लावण्यासाठी तिचा हात पुरत नव्हता. त्यामुळे लोखंडी स्टूलवर उभी राहून ती दोर वरच्या बाजूला लावत होती.यावेळी स्टूल हलला आणि ती खाली कोसळली.
तरल हिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नंदकिशोर आटपाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिसांनी गुन्हा नोंद करत पुढील तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List