Nanded News – नांदेड शहरातील गोळीबार प्रकरण, मुख्य सूत्रधाराला पोलिसांकडून बेड्या, आतापर्यंत नऊ जणांना अटक

Nanded News – नांदेड शहरातील गोळीबार प्रकरण, मुख्य सूत्रधाराला पोलिसांकडून बेड्या, आतापर्यंत नऊ जणांना अटक

हरविंदरसिंग उर्फ रिंधा याच्या भावाचा खून केल्याप्रकरणी पॅरोलवर असलेल्या गुरमितसिंग सेवादार आणि त्याच्या मित्रावर गोळीबार केल्याप्रकरणी नांदेड पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. या गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार असलेला दहशतवादी हरप्रितसिंग उर्फ हॅप्पी पॅसिया याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्हेस्टिगेशन या गुप्तचर संस्थेने ताब्यात घेतले आहे. हरप्रितसिंगला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नांदेड शहरात 10 फेब्रुवारी रोजी रिंधा याच्या भावाचा खून करणार्‍या आरोपीवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र हत्येचा आरोपी गुरमितसिंग राजासिंग सेवादार हा जखमी झाला. तर त्याचा मित्र रविंद्रसिंग दयालसिंग राठोड हा गोळीबारात ठार झाला. गुरमितसिंग सेवादार जन्मठेपेची शिक्षा भोगत असून तो पॅरोलवर सुटला होता. नांदेड पोलिसांनी जेल प्राधिकरणाला सेवादार याची सुटका करु नका, काही घातपात होवू शकतो असे लेखी पत्रही दिले होते. यानंतरही पॅरोलवर त्याची सुटका झाली आणि 10 फेब्रुवारी रोजी हि गोळीबाराची घटना घडली.

या प्रकरणात स्थानिकचे पाच व पंजाबमधून चार अशा नऊ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास एनआयए व दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे देण्यात आला होता. गुप्तचर यंत्रणा, एटीएस व एनआयएने या प्रकरणाचा गोपनीय पद्धतीने तपास सुरु केला. पंजाबमधील रहिवाशी असलेल्या संशयित दहशतवादी हरप्रितसिंग उर्फ हॅप्पी पॅसिया याने त्याच्या सहकार्‍यासोबत पंजाब राज्यात गेल्या काही महिन्यात धुमाकूळ घातला होता. हत्या करणे, हत्येचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, ग्रेनेड हल्ले करणे यासारखे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. पंजाब व हरियाणा पोलिसांना तो हवा आहे.
अनेकवेळा अथक परिश्रम करुनही तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्याच्यावर पाच लाखाचे बक्षिसही जाहीर केले होते. पॅसिया कॅनडात असल्याची माहिती एनआयए व एटीएसच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे दोन दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली. पंजाबमधील झालेल्या घटना तसेच नांदेडच्या गोळीबाराशी त्याचा सबंध असल्याने त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया एनआयएने व एटीएसने सुरु केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म