चिकन विक्रीवरून दोन खाटकांमध्ये हाणामारी; अल्पवयीन युवकाचा मृत्यू
एकमेकांच्या शेजारी असलेल्या दोन खाटकांमध्ये चिकनच्या दरातील तफावतीच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून आरोपी देखील अल्पवयीन आहे.
मस्क्केज-अंबाजोगाई रोडवर बसस्टँडजवळ अझहर चिकन दुकान असून तेथे त्यांचा १७ वर्ष वयाचा चुलत भाऊ हा त्यांना मदत करीत असतो. तर त्यांच्याच शेजारी मराठवाडा चिकन सेंटर नावाचे चिकन विक्रीचे दुकान आहे. त्या दुकानावर 17 वर्ष वयाचा अल्पवयीन मुलगा कामाला असतो. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये जबर मार लागल्याने एक अल्पवयीन मुलगा बेशुध्द झाला.
तो काहीच बोलत नसल्याने अझहर यांनी लागलीच त्यांचे भाऊ इम्रान खुरेशी यास कॉल करून झालेली घटना सांगून लवकर यायला सांगितले. त्यानंतर त्यांनी जखमीस रिक्षामध्ये टाकून डॉ. डोईफोडे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉ. डोईफोडे यांनी त्याला सरकारी दवाखाना केज येथे लवकरात लवकर घेऊन जाण्याचा सल्ला दिला. येथील उपजिल्हा रूग्णालयात घेवून गेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा यांनी जखमीला तपासले असता तो मयत असल्याचे जाहीर केले. या प्रकरणी दुसऱ्या अल्पवयीन खाटकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे पुढील तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List