चॅटजीपीटीने इन्स्टाग्राम, टिकटॉकला टाकले मागे
मार्च महिन्यात घिबली स्टुडिओ आर्ट ट्रेंड आणणाऱ्या चॅटजीपीटीने एक नवा विक्रम केला आहे. चॅटजीपीटीने सर्वाधिक डाऊनलोड करण्याचा नवा रेकॉर्ड केला असून यात इन्स्टाग्राम आणि टिकटॉकला मागे टाकले आहे. गेम्स वगळता, चॅटजीपीटी हे जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेले अॅप बनले आहे, ज्याने 46 दशलक्ष नवीन डाऊनलोड्स नोंदवले.
इंस्टाग्राम आणि टिकटॉक गेल्या अनेक वर्षांपासून अॅप डाऊनलोडच्या यादीत आघाडीवर होते. परंतु, आता चॅटजीपीटीमध्ये मार्च महिन्यात घिबली स्टुडिओ आर्ट टूल जोडले गेले. तेव्हापासून ते डाउनलोड करणाऱयांची संख्या सतत वाढत आहे. 46 दशलक्षपैकी 12 कोटी आयओएस आहेत तर 33 दशलक्ष अँड्रॉइड डिव्हाइसेसचा समावेश होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List