चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांची स्थिती गंभीर, काही नद्या प्रदूषित काही नद्यांची झाली गटारगंगा
चंद्रपूर जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांची स्थिती बिकट झाली आहे. चंद्रपुरातून वाहणाऱ्या इरई आणि झरपट या दोन नद्या तर गटारगंगा झाल्या असून, वर्धा आणि वैनगंगा या मोठ्या नद्याही प्रदूषित झाल्या आहेत. अलीकडेच प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नद्यांच्या स्वच्छतेचा विषय समोर आला. या पार्श्वभूमीवर अभ्यासकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांच्या स्थितीचा अभ्यास केला. त्यात गंभीर चित्र पुढे आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या साईटवर जी माहिती देण्यात आली, त्यापेक्षाही गंभीर स्थिती या नद्यांची असल्याचे चित्र आहे. चंद्रपूरचा विचार करता, इथे शहरातून इरई आणि झरपट या नद्या पूर्णतः दूषित झाल्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये उद्योगांचे रसायन सोडले जात असल्याने त्याचे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. जिल्ह्यातील उमा, अंधारी या नद्यांची स्थिती वेगळी नाही. संपूर्ण शहरातील घाण या नद्यांमध्ये टाकली जात असल्याने त्यांना गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नद्यांच्या स्वच्छतेचा आराखडा तयार केला गेला, मात्र त्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. अभ्यासकांनी आता त्यावर बोट ठेवले आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने चला जाऊया नदीला हा उपक्रम सुरू केला. तत्कालीन वनमंत्री यांनी जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत वर्धा इथून या उपक्रमाची सुरुवात केली. यात राज्यातील जवळपास 55 नद्यांची स्वच्छता केली जाणार होती. मात्र हा उपक्रम नंतर केवळ कागदावर राहिला. तो लागू करण्याची गरज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त
या प्रश्नावर जिल्ह्यातील एकही संबंधित अधिकारी बोलायला तयार नाही. जिल्हाधिकारी असोत, पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग हे सारेच कॅमेऱ्यावर बोलायला तयार नाहीत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List