Mumbai News – आयपीएल सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियममधून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरला, पोलिसांकडून चोराचा शोध सुरु
वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल सामना पहायला गेलेल्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी मुझफ्फर शेख यांनी पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. शेख यांच्या तक्रारीनुसार, मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी मुझफ्फर शेख हे बुधवारी कुटुंबासह वानखेडे स्टेडियममध्ये रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना पहायला गेले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने शेख यांच्या खिशातील आयफोन चोरला.
मरीन ड्राईव्ह पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस स्टेडियममधील आणि स्टेडियमभोवती बसवलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List