Pune News – जमिनीच्या वादातून हाणामारी, सहा जणांविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल
शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या इचकेवाडी येथे जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संतोष बाळकृष्ण इचके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करीत आहेत.
बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके आणि इतर पाच नातेवाईकांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 एप्रिल रोजी सकाळी पावणे बाराच्या दरम्यान घडली. संतोष बाळकृष्ण इचके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीच्या गट क्र.104 या जमिनीच्या शेजारी आरोपी कांद्याची आरण (चाळ) बांधण्याचा प्रयत्न करत होते.
यावेळी संतोष इचके व त्यांचे कुटुंबीय भाऊ राजेंद्र, भावजय सुरेखा, आई मंगल आणि पत्नी रूपाली यांनी बांधकाम थांबवा म्हणून सांगितले असता आरोपींनी चिडून जाऊन त्यांना मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List