ना देशहित, ना बिहारचा विकास! ही तर संधीसाधुंची युती, मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी आणि नितीश कुमारांवर तिखट हल्ला
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच वर्षीच्या अखेरीस होणार्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने
आतापासूनच काँग्रेसने जोर लावायला सुरुवात केली आहे. रविवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बिहारच्या बक्सर येथे जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर तिखट शब्दांमध्ये हल्ला चढवला. मोदी आणि नितीश कुमार यांची युती संधीसाधू असल्याचा हल्लाबोल खरगे यांनी केला.
नरेंद्र मोदी और नीतीश कुमार की जोड़ी सिर्फ कुर्सी के लिए है।
ये दोनों लोग बिहार और देश की भलाई के लिए नहीं, बल्कि दलितों, आदिवासियों, पिछड़ों और किसानों को बर्बाद करने के लिए एक साथ आए हैं।
: कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge
बक्सर, बिहार pic.twitter.com/EZ2R0YQ13S
— Congress (@INCIndia) April 20, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List