साय-फाय – व्हॉट्सअॅप 4 आणि इन्स्टाग्राम विकले जाणार?

साय-फाय – व्हॉट्सअॅप 4 आणि इन्स्टाग्राम विकले जाणार?

>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]

अमेरिकेत सध्या मार्क झुकरबर्गच्या मेटा या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनीविरुद्ध आण्टी ट्रस्ट खटला सुरू झाला आहे. वॉशिंग्टनमध्ये सुरू असलेल्या या खटल्यात मेटाने बाजारातील स्पर्धा संपवण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम खरेदी केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या कॉम्पिटिशन अॅंड कन्झ्युमर वॉच डॉग या संस्थेने हे आरोप केले आहेत. मेटाने 2012 मध्ये एक बिलियन डॉलर्सला इन्स्टाग्राम आणि 2014 मध्ये 22 बिलियन डॉलर्सला व्हॉट्सअॅप खरेदी केले होते. हा खटला जर मेटा कंपनीच्या विरोधात गेल्यास मार्क झुकरबर्गला इच्छा नसतानादेखील व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकते.

अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनच्या (FTC) परवानगीने ही खरेदी पार पडली होती. खरेदीच्या करारानंतर पुढील प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही FTC ची असते. खरेदीनंतरच्या काळात मेटा या कंपनीने वाढती स्पर्धा रोखण्यासाठी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप खरेदी केल्याचे इऊण्च्या लक्षात आले आणि त्यांनी मेटाविरुद्ध दावा दाखल केला. अमेरिकेत आण्टी ट्रस्ट कायदा अत्यंत कडक आहे. बाजारातून स्पर्धा संपवणे आणि बाजारावर एकाधिकारशाही प्रस्थापित करणे हे तिथे गुन्हे मानले जातात आणि त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येते.

सदर खटल्यामध्ये आता FTC ला मेटाने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची खरेदी ही एका विशिष्ट हेतूने केली असल्याचे सिद्ध करावे लागेल. जर मेटाने भूतकाळात इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची खरेदी केली नसती तर आज सोशल मीडियाचे चित्र किती वेगळे असते हेदेखील स्पष्ट करावे लागणार आहे. त्यासाठी FTC ने पुरावा म्हणून एक ई-मेल सादर केला आहे. त्यात झुकरबर्गने ‘स्पर्धा करण्यापेक्षा खरेदी केलेले चांगले’ असे म्हटले आहे. या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्यांना त्या काळात खरेदी करून मेटाने एक प्रकारे सोशल मीडियावर एकाधिकारशाही स्थापन केल्याचे FTC चे म्हणणे आहे. मात्र आपला बचाव करताना मेटाने त्यांच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला रेडिट, स्नॅपचाट, टिकटॉक अशा प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून जोरदार टक्कर मिळत असल्याचा दावा केला आहे. बाजारात पूर्वी होती तशी स्पर्धा आजदेखील सुरू आहे, असा दावा मेटातर्फे करण्यात आला आहे.

सध्या जगभरात सोशल मीडिया कंपन्यांवर अनेक महत्त्वाचे खटले दाखल आहेत. हा खटलादेखील त्यापैकी एक महत्त्वाचा खटला मानावा लागेल. एकाधिकारशाहीची व्याख्या आणि दुष्परिणाम, सोशल मीडिया कंपन्यांची अरेरावी, विविध देशांतील सरकारविरुद्ध घेतलेली भूमिका अशा सर्व संदर्भात हा खटला महत्त्वाचा ठरणार आहे. या खटल्याचा निकाल नक्की काय लागेल, याचा अंदाज सध्या विविध देशांतील तज्ञ मांडत आहेत. काही तज्ञांच्या मते सध्या सोशल मीडियावर यूटय़ूब, स्नॅपचाट, टिकटॉक हे चांगली कामगिरी करत असून त्यांची लोकप्रियतादेखील मोठी आहे. अशा वेळी मेटाच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या खरेदीने बाजारातील स्पर्धा संपली या आरोपाला काही आधार उरत नसल्याचे दिसते. मेटासाठी हा खटला अत्यंत सोपा असल्याचे मत ते मांडतात.

इतर काही तज्ञ मात्र बरोबर विरुद्ध असे मत नोंदवतात. त्यांच्या मते FTC ने पुरावा म्हणून जो ई-मेल कोर्टात सादर केली आहे, तो मार्क झुकरबर्गच्या मेटा कंपनीसाठी मोठी अडचणीची ठरणारी आहे. बाजारात वर्चस्व राखण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यांना गिळंकृत करण्यासाठी कसे डावपेच आखले जातात आणि बाजारात स्पर्धा उरू नये अथवा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात हेच यामध्ये उघड झाले आहे. प्रतिस्पर्ध्यांविषयी असलेली मानसिकता या ई-मेलमध्ये दिसते असे त्यांचे मत आहे. हा ईöमेल FTCसाठी मोठे शस्त्र ठरू शकते. अशा वेळी जर FTC ने हा खटला जिंकला आणि मेटाला इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप विकावे लागले तर तो कंपनीसाठी एक जबरदस्त दणका असणार आहे. मेटाचे 50 टक्के उत्पन्न एकटय़ा इन्स्टाग्रामद्वारे मिळत असते. अशा वेळी उत्पन्न आणि वर्चस्व दोन्ही टिकवण्यासाठी मेटादेखील जीवतोड प्रयत्न करणार हे नक्की.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म