नाद लय बेक्कार! तरुणाने जुगारात गमावली सहा एकर जमीन
एका तरुण शेतकऱ्याने ऑनलाइन जुगारात 90 लाख रुपये कॅश, 6 एकर जमीन आणि 2 तोळे सोने गमावल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिह्यातील कुर्डूवाडीत उघडकीस आली आहे. यावेळी गेम हरलो, पण पुढच्या वेळी नक्की जिंकू, या भाबड्या आशेवर या तरुणाची सर्व संपत्ती हातातून गेली. बालाजी खरे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तो दोन वर्षांपासून मोबाईलवर जुगार खेळाचा, परंतु त्याला या गेममध्ये कधीच पैसे मिळाले नाहीत. फसवणूक झाल्याचे समजताच त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
‘चक्री गेम’ने चक्रात पाडले
चक्री गेम हा एक ऑनलाइन गेम असून तो एकप्रकारचा जुगार आहे. या गेममध्ये झटपट पैसे कमवण्याचे आमिष दाखवले जाते. हा गेम खेळणारे अनेक तरुण देशोधडीला लागले आहेत. हा गेम खेळण्यासाठी बालाजीने एजंटला लाखो रुपये मोजले. एजंटला पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करायचा. पैसे पाठवल्यानंतर गेम खेळण्याची मुभा मिळत असायची. गेलेले पैसे एक दिवस परत येतील, या आशेवर बालाजी गेमवर पैसे लावत गेला अन् देशोधडीला लागला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List